Maharashtra Vidhan Parishad Election 2020 | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Vidhan Parishad Election 2020: राज्य विधमंडळाच्या कनिष्ठ सभागृहासाठी विधानसभा निवडणूक 2019 पार पडल्यानंतर आता वरिष्ठ सभागृहासाठी विधानपरिषद निवडणूक 2020 पार पडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( Nationalist Congress Party) आणि शिवसेना (Shiv Sena) अशा दोन्ही पक्षांचे अनुक्रमे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे विधानसभेवर निवडूण गेल्याने रिक्त झालेल्या जागांसाठी विधानपरिषद निवडणूक पार पडत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची आज शेवटची मुदत आहे. दरम्यान, बीड (Beed) येथील विधानपरिषद जागेसाठी येत्या 24 जानेवारीला तर, यवतमाळ (Yavatmal) येथून भरल्या जाणाऱ्या जागेसाठी 31 जानेवारी या दिवशी मतदान पार पडत आहे.

बीड येथून रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संजय दौंड यांना रिंगणात उतरवले जाणार आहे. तर, त्यांच्या विरोधात भाजप राजन तेली यांना उमेदवारी देणार आहे. दुसऱ्या बाजूला यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेकडून भरल्या जाणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना दुष्यंत चतुर्वेदी यांना मैदानात उतरवत आहे. तर, शिवसेनेच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी भाजप अद्याप चाचपणी करत आहे. मात्र, भाजपकडून किशोर कान्हेरे यांच्या नावावर शिकामोर्तब होण्याची शक्यता आहे.विधान परिषद निवडणूक 2020 साठी येत्या 24 जानेवारी रोजी मतदान पार पडत आहे.

संजय दौड हे राज्याचे माजी मंत्री आणि सहकार क्षेत्रातील मोठे नाव पंडीतराव दौंड यांचे चिरंजीव आहेत. पंडीत दौंड यांनी 1985 मध्ये भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. पंडीतराव दैंड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांचे जुने संबंध आहेत. त्यामुळे हे संबंध जपत तसेच विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द पाळत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संजय दौंड यांना उमेदवारी दिली आहे. संजय दौंड हे गेली अनेक वर्षे बीड जिल्हा परिषद राजकारणात अग्रेसर आहेत.

भाजपचे राजन तेली हे कोकणातील आहेत. विधानसभा निवडणूक 2020 मध्ये त्यांनी शिवसेना उमेदवार दीपक केसरकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. महत्त्वाचे म्हणजे विधानसभा निवडणूक 2020 शिवसेना-भाजप युतीद्वारे लढले होते. युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. त्यामुळे इथे भाजप उमेदवार उभा नव्हता. परंतू, तेली हे भाजपचे असल्याने त्यांनी इथे अपक्ष निवडणूक लढवली होती. नारायण राणे यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर शिवसेनेची कोकणामध्ये कोंडी करण्यासाठी भाजपने रसद पुरवली होती. तेली हा या रसदीचाच भाग होता असे बोलले जाते. (हेही वाचा, Maharashtra ZP Election Results 2020: जिल्हा परिषद निवडणूक निकाल फक्त एका क्लिकवर; पाहा पालघर, धुळे, वाशिम,अकोला, नंदुरबार, नागपूर येथे कोणी मारली बाजी)

दुसऱ्या बाजूला यवतमाळ येथील जागेबाबत बोलायचे तर इथून निवडूण आलेले शिवसेनेचे तानाजी सावंत हे विधानसभेवर निवडूण गेले आहेत. त्यामुळे इथली जागा रिक्त झाली आहे. ही जागा भरण्यासाठी इथे शिवसेना-भाजप यांच्यात जोरदार सामना रंगण्याची शक्यता आहे. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेकडून भरल्या जाणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना दुष्यंत चतुर्वेदी यांना मैदानात उतरवत आहे. तर, शिवसेनेच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी भाजप अद्याप चाचपणी करत आहे. मात्र, भाजपकडून किशोर कान्हेरे यांच्या नावावर शिकामोर्तब होण्याची शक्यता आहे.