ऑमेझॉन शॉपिंग (फोटो सौजन्य- ट्विटर)

येत्या दिवाळीसाठी विविध ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट ग्राहकांना भरघोस प्रमाणात सूट देत आहेत. पण ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर थोडे जपूनच करा. कारण यापूर्वी ऑनलाईन ऑर्डर केलेल्या वस्तूंच्या ऐवजी भलतीच वस्तू त्या येणाऱ्या पार्सलमध्ये मिळाल्याचा घटना घडल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ऑनलाईन शॉपिंगमुळे एका महिलेला चक्क स्पीकर्स ऐवजी लाडू पणत्या दिल्या गेल्या आहेत.

अॅमेझॉनसारखी ऑनलाईन कंपनी सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्यामुळे सध्याच्या दिवसात चालू असलेल्या सेलमुळे एका महिलेने सात हजाराचे स्पीकर्स ऑनलाईन घेतले. मात्र या स्पीकर्सच्या डिलेव्हरीच्या नंतर या महिलेने उघडून पाहिले तर त्यात लाडू पणत्या दिल्याचा प्रकार तिच्या सोबत घडला आहे. या महिलेने तिच्या ट्विटरवरुन अॅमेझॉनबद्दल संताप व्यक्त केला आहे.

तर तिच्या या ट्विटरच्या पोस्टमध्ये ती असे म्हणाली की, आधी लाडू खाऊ की दिवे लावू अशा संतप्त शब्दात तिने राग व्यक्त केला आहे.