Raj Thackeray, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे. फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा मनसे-भाजप (MNS and BJP) युतीच्या चर्चेला उधाण आले आहे. याआधी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसे-भाजप युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र  एकमत न झाल्याले युती झाली नसल्याची माहिती आहे. आता मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुका जवळ आल्यावर पुन्हा एकदा चर्चा आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरे यांच्या घरी भेट घेतली आहे. या भेटीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस हे राज ठाकरेंचे निवासस्थान शिवतीर्थावर गेले आहेत.

ही एक कौटुंबिक भेट असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या बैठकीत युतीची चर्चा झाली असल्याचा अंदाज नाकारता येत नाही. दिवाळीमध्ये भाजप आमदार आशिष शेलार यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली होती.  मागील दोन ते तीन महिन्यांपासून मनसे-भाजपमध्ये युतीची चर्चा सुरु आहे. हेही वाचा महाराष्ट्रात लवकरच सुरू होणार पहिली ते चौथीचे वर्ग; चाईल्ड टास्क फोर्सने हिरवा कंदील दिल्याचा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

नोव्हेंबरमध्ये राज ठाकरे यांनी कोरोनावर मात केली होती. त्यानंतर दिवाळीमध्ये राज ठाकरे आपल्या नव्या घरी आले.  या नव्या घरी देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आहे. 2019 मध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली होती. शिवसेनेनं युती तोडल्यानंतर भाजप नव्या मित्रपक्षासोबत युती करण्यास उत्सुक आहे. भाजपा आणि मनसे युती होऊ शकते, अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. ही युती मुंबई महापालिका निवडणुकीत होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.