Devendra Fadnavis (Photo Credit - Facebook)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूने (Coronavirus) हाहाकार माजवला असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत. राज्यात दिवसेंदिवस कोरोनामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या राज्यातील वेगवेगळ्या भागातील रुग्णालयांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. नुकताच देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे (Thane) जिल्ह्याचा आढावा घेतला आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारला (Maha Vikas Aghadi) महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. भारतात कोरोना विषाणूने थैमान घातला असून देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. याबाबतही देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे समजत आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्रात 8 जुलैपासून हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस उघडण्यास परवानगी; राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचना-

- मुंबई आणि एमएमआरमध्ये कोरोनाची चाचणी वाढवण्याची गरज आहे.

- कोरोनाचा अहवाल तात्काळ आला पाहिजेत.

- रुग्णांवर चांगले उपचार होण्यासाठी सरकारने महानगरपालिकांना आर्थिक मदत दिली पाहिजे.

- राज्यातील रुग्णालयात आयसीयू आणि व्हेंटिलेटरची संख्या वाढवणे गरजेचे आहे.

तसेच, हे सरकार आम्ही पाडणार नाही. ते अंतर्विरोधाने पडेल. 12 आमदारांपेक्षा महाराष्ट्राची 12 कोटी जनता आमच्यासाठी महत्वाची आहेत. कोरोनावरून लक्ष विचलित करण्यासाठी वारंवार नव्या कपोलकल्पित कथा रचणे योग्य नाही. सारथी संस्था आमच्या काळात स्थापन झाली, म्हणून ती खिळखिळी करण्याचा प्रकार योग्य नाही. राज्य सरकारला आमची जी काय मदत हवी असेल, ती द्यायला आम्ही तयार आहोत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.