लातूर: माहिती अधिकारातून माहिती मागवत त्रास दिल्याच्या संतापाने भाजप कार्यकर्त्यावर चाकूहल्ला, मृत्यू
फोटो सौजन्य - PTI

लातूर  (Latur) येथे माहिती अधिराकाऱ्यांकडून माहिती मागवून त्रास दिल्याच्या संतापातून भाजप कार्यकर्त्यावर चाकूहल्ला करण्यात आला. या प्रकरणी कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. परंतु हत्या करण्यात आल्याने तणावाचे वातावरण आहे.

राजेंद्र जाधव असे चाकूहल्ला केलेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. शिरोळ वांजरवाडा येथे आज गावाचे सरपंच आणि त्यांचा पुतण्या या दोघांनी मिळून राजेंद्र याच्यावर भरचौकात चाकूहल्ला केला. तर राजेंद्र यांनी माहिती अधिकारातून माहिती काढल्याच्या रागाने या दोघांनी राजेंद्र याच्यावर चाकूने सपासप वार करत हत्या केली.(शाळेच्या वस्तूंसाठी पैशांची मागणी केली म्हणून जन्मदात्या बापानेच आपल्या 11 वर्षाच्या मुलीला पाजले विष)

सकाळच्या वेळेस राजेंद्र बस स्थानकावर चहा पीत उभे होते. त्यावेळी गावाचे सरपंच यांनी त्याच्यावर चाकूने वार केल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तर मृत राजेंद्र यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.