शाळेच्या वस्तूंसाठी पैशांची मागणी केली म्हणून जन्मदात्या बापानेच आपल्या 11 वर्षाच्या मुलीला पाजले विष
Representational Image (Photo Credits: PTI)

सहाव्या इयत्तेत शिकणा-या मुलीने आपल्या पित्याकडून शाळेसंबंधी वस्तू विकत घेण्यासाठी पैशांची मागणी केली म्हणून दारुच्या नशेत असलेल्या बापाने आप्या मुलीलाच कीटकनाशक पाजल्याचा धक्कादायक प्रकार नाशकात घडलाय. या प्रकरणी आरोपी पंढरीनाथ बोराडे याला अटक करण्यात आली आहे.

पंढरीनाथ याची सहाव्या इयत्तेत शिकणा-या मुलीने त्याच्याजवळ शालेय साहित्य विकत घेण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र दारुच्या नशेत असलेल्या पंढरीनाथ याने रागाच्या भरात आपल्या मुलीला विष पाजून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. इतकच नव्हे तर विषारी किटकनाशक पाजण्याआधी त्याने आपल्या मुलीला मारहाणही केली. नाशिकमधील शिंदे गावात हा प्रकार घडलाय.

यात घटनेत मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पंढरीनाथ बोराडे याच्या धाकट्या मुलानेच आपल्या वडिलांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केली.

ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी आपले वडिल खूप दारू प्यायले होते आणि दारूच्या नशेतच त्यांनी हा गुन्हा केला असे त्याने सांगितले आहे.

हेही वाचा- आंतरजातीय विवाह: लेकीसह जावयाला पेटवले; अहमदनगर येथील घटना

मुलींना मारहाण केल्याच्या, त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या घटना काही नवीन नाही. रोज कुठे ना कुठे, काही ना काही मुलींवर अत्याचार केल्याच्या घटना ऐकायला मिळतातच. महिलांवरील, लहान मुलींवर अत्याचार थांबावे म्हणून प्रशासन ब-याच योजना राबवत असतो. मात्र तरीही ह्या घटना काही थांबत नाही.

लहान मुलींवर होणारे अत्याचार, मारहाण थांबवण्यासाठी सरकारने काही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे.