Arrests | (Photo credit: archived, edited, representative image)

Mumbai Crime: मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने  (Economic Offences Wing) दिवंगत डेव्हलपर आणि फिल्म फायनान्सर युसुफ लकडावाला यांचा मुलगा फिरोज यांला अटक करण्यात आले आहे. तब्बल 45 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. फिरोज सोबत त्यांच्या कंपनीचे चार्टर्ड अकाउंटंट अकबर पीरबॉय याला देखील अटक केले आहे. (हेही वाचा-राज्याच्या महासंचालक रश्मी शुक्ला रुग्णालयात दाखल, उपचार सुरु)

मिळाललेल्या माहितीनुसार, युसुफ लकडावाला यांच्या मुलावर सीए अकबर पीरबॉय यांच्या सोबत अनेक कौटुंबिक मालमत्ता हडप केल्याचा आणि कंपनीच्या शेअरमधील तिच्या सावत्र आईची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मे मध्ये EOW ने फिरोजवर फसवणूक, गुन्हेगारी कट आणि विश्वासघात केल्याचा गुन्हा दाखल केला.

एका गुन्हेगारी प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने युसुफ लकडावाला यांना अटक करण्यात आले होते. त्यावेळी 2021 मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. आता त्यांची दुसरी पत्नी शबीना हिने फिरोजविरुध्द EOW मध्ये तक्रार दाखल केली. तक्रारदार शबीना यांंनी सांगितले की, युसुफ आणि तिच्या शेअर्स फिरोजने धोक्याने नावावर करुन घेतले. तब्बल 45 कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. युसुफ जेलमध्ये असताना फिरोजने अनेक मालमत्ता त्यांच्या नावावर केली होती.