गानसम्राज्ञी लता मंगेशकर 'व्हेंटीलेटर'वर; प्रकृतीत सुधारणा होत असल्याची चिन्हं
Lata Mangeshkar (Photo Credits: IANS)

ज्येष्ठ गायिका गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना रविवारी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले होते. सोमवारी औषधोपचारानंतर त्यांच्या छातीतील जंतूसंसर्ग नियंत्रणात आल्याची माहिती मंगेशकर कुटुंबीयांतर्फे देण्यात आली होती. सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात लतादीदींवर उपचार सुरू आहेत. इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सध्या लता मंगेशकर यांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे.

लतादीदी सध्या निमोनियाने ग्रस्त आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असली तरी गेल्या काही तासांत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याचे डॉ. प्रतित समदानी यांनी सांगितले आहे. ब्रीच कँडी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णांच्या गोपनीयतेचा हवाला देऊन लतादीदींच्या प्रकृतीविषयी अधिक माहिती देण्यास नकार दिला. परंतु, त्यांच्या कुटुंबियांनी लतादीदींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.

(हेही वाचा - लता मंगेशकर यांचा आज 90 व्या जन्मदिनी 'Daughter of the Nation' पदवीने भारत सरकार करणार गौरव)

हेही वाचा - लता मंगेशकर यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त सचिन तेंडूलकर याने व्हिडिओच्या माध्यमातून दिल्या खास शुभेच्छा (Watch Video)

येत्या 28 नोव्हेंबर रोजी लता मंगेशकर या 90 वर्षांच्या झाल्या. त्यांच्या जन्मदिनी अनेक दिग्गज कलाकारांनी लता मंगेशकर यांना शुभेच्छा दिल्या होत्या. यात धर्मेंद्र, हेमा मालिनी, ऋषी कपूर, माधुरी दिक्षित, ए. आर. रेहमान, श्रेया घोषाल आणि अनिल कपूर आदींचा समावेश होता.