लालबागचा राजा मंडळाला 6 वर्षात 60 लाखांचा दंड, मंडपासाठी खणलेले खड्डे न बुजवल्याने प्रशासनाची कठोर कारवाई
Lalbaugcha Raja (Photo Credits: Twitter/ Lalbaugcha Raja)

सर्वांच्या लाडका आणि मुंबईतील मानाचा राजा म्हणून ओळख असलेल्या 'लालबागचा राजा' (Lalbaugcha Raja) मंडळाला सध्या एका नवीन समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या मंडळाने मागील 6 वर्षात मंडपासाठी खणण्यात आलेले खड्डे न बुजवल्याने मुंबई महापालिकाने 60 लाखांचा दंड आकारला आहे, अशी माहिती स्थानिक कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर (Mahesh Vengurlekar) यांना DNA शी बोलताना दिली. महेश यांनी माहिती अधिकारामध्ये ही बाब उघडकीस आणली असून लालबागचा राजाच्या मंडळाच्या व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

माहिती अधिकाराच्या अहवालानुसार महेश वेंगुर्लेकर यांनी DNA ला दिलेल्या माहितीनुसार, या मंडळाने 2018 साली 953 खड्डे खणले होते. दरवर्षी खड्ड्यांची ही संख्या कायम असते. मात्र यात त्यात बुजले जाणारे खड्डे हे फार क्वचितच असतात. तसेच मंडळाने त्यांच्यावर आकारण्यात आलेला दंडही पूर्ण न भरल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.

हेही वाचा- लालबागच्या राजाला एका निनावी भक्ताने अर्पण केली सोन्याचा मुलामा असलेली पावलं

मात्र लालबागचा राजा मंडळाने यास स्पष्ट नकार दिला असून आम्ही पूर्ण दंड महापालिकेला (BMC) भरला असल्याचे सांगितले असून त्यासंबंधीची पावतीही आमच्याकडे आहे, मात्र एका महापालिकेच्या एका अभियंताने ते नाकारल्याचे असे मंडळाचे अध्यक्ष सुधीर साळवी यांनी सांगितले आहे.

महापालिकेच्या नियमानुसार, जर मंडपासाठी खणण्यात आलेले खड्डे संबंधित मंडळाकडून पुर्णपणे बुजवले नसल्यास प्रत्येकी खड्ड्यामागे 2000 रुपये दंड आकारला जातो. न बुजवलेल्या खड्ड्यांवर अतिरिक्त व्याज आकारून त्या संबंधीची नोटीसही बीएमसीकडून मंडळाला देण्यात आली असल्याचे वेंगुर्लेकर म्हणाले.

दंड न भरल्याने महापालिका लवकरच या मंडळावर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात येतय. तर गणेशोत्सव संपताच हे खड्डे त्वरित बुजविण्यात येतील असे गणेशोत्सव कमिटीकडून सांगण्यात येत आहे.