Online Services | Representational image (Photo Credits: pxhere)

महाराष्ट्रात राज्य सरकार कडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे (Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रूपये दिले जातात. या योजनेचा फायदा गोर गरीब महिलांना मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील असताना एका व्यक्तीने पत्नीच्या नावे 30 वेगवेगळे अर्ज केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकाच महिलेच्या नावे 30 अर्ज करताना वेगवेगळ्या आधार कार्डांचा वापर करून एकच मोबाईल नंबर देऊन रक्कम लाटल्याचं समोर आलं आहे.

सातारा मधील या व्यक्तीने 30 अर्ज करून 26 अर्जांची रक्कम आपल्या सहकारी बॅंकेच्या खात्यामध्ये मिळवल्याचं समोर आलं आहे. या व्यक्तीने एकाच पत्नीचा फोटो मात्र वेगवेगळ्या पोशाखात काढून 27 महिला असल्याचं दाखवलं. या प्रकरणी पनवेल तहसिल कार्यालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नवी मुंबई मध्ये खारघर येथील रहिवासी असलेल्या पूजा महामुनी यांनी अर्ज दुसर्‍या क्रमाकांवरून दाखल करून मंजूर करण्याचा प्रयत्न करताना हा प्रकार उघड झाला. भाजपाचे माजी नगरसेवक निलेश बाविस्कार यांना अर्ज दाखल करण्यासाठी मदत मागितली असता 29 ऑगस्ट दिवशी त्यांनी मोबाईल नंबर द्वारा लॉगीन करण्याचा प्रयत्न केला. मात्र लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल असल्याचं आणि तो मंजूर करण्यात आल्याची देखील माहिती दाखवण्यात आली. या प्रकारामुळे सरकारला गंडवल्याचा प्रकार समोर आला.

निलेश यांनी एका सामाजिक कर्त्यांच्या मदतीने या प्रकरणी शोध घेतला. त्यावेळी 30 लाभार्थी महिलांची खाती एकाच मोबाईल नंबर वर होती आणि त्यापैकी 27 लाभार्थ्यांचं एकच नाव होतं पण आधार कार्डचा नंबर वेगवेगळा वापरला होता. त्यामध्ये 26 अर्ज मंजूर झाले होते. Majhi Ladki Bahin Yojana Online Registration Process: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कागदपत्रे, नोंदणी, निकष आणि अर्ज कसा करावा? घ्या जाणून.  

सध्या पनवेल तहसिलदारांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही  31 ऑगस्ट होती. मात्र आता अजून एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज बाद झालेल्यांना, रखडलेल्यांना त्याचा फायदा मिळणार आहे पण 1 सप्टेंबरपासून अर्ज करणाऱ्या महिलांना सप्टेंबर महिन्यापासून पुढे पैसे दिले जाणार आहेत.