Photo Credit- X

Kurla Bus Accident: कुर्ला मध्ये सोमवारी रात्री बेस्ट बसचा (Best Bus)भीषण आपघात झाला. अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 43 जण जखमी झाले. पोलिसांनी या अपघातातील दोषी चालक संजय मोरे याला अक केली. आहे. अपघातानंतर मंगळवारी आणि बुधवारी कुर्ला स्थानकाच्या(Kurla Bus Accident) पश्चिमेकडील बेस्ट बस सेवा बंद करण्यात आली आहे. याचा गैरफायदा तेथील रिक्षा चालक घेत असल्याचे पहायला मिळत आहेत. बस स्टँडवरिल रिक्षा चालकांनी भाडे वाढवले आहेत. (Kurla Bus Accident: 'योग्य प्रशिक्षणाचा अभाव'; कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती)

बीकेसी, कलिना, विद्यापीठापर्यंत धावणाऱ्या शेअर रिक्षांचे दर वाढवण्यात आले आहेत. यामुळे या मार्गावरील प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे. कुर्ला येथील अपघातानंतर बस मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे कुर्ला रेल्वे स्थानक पश्चिम ते कलिना, विद्यापीठ, वांद्रे कुर्ला संकुल या प्रवासासाठी शेअर रिक्षाचालक 40 रुपयांची मागणी करत आहेत.

बेस्ट बसने हा प्रवास केल्यास हा प्रवास 10 रुपयांत होतो. मात्र त्या उपलब्ध नसल्याने प्रवाशांना 40 रुपये मोजावे लागत आहेत. बसमार्ग 37,320,319,325,330,365 आणि 446 बसेस कुर्ला आगारातून धावतात. तर सांताक्रुझ स्टेशन ते कुर्ला स्टेशनपर्यंत बसमार्ग 311,313 आणि 318 च्या बसेस जातात.