Sharad Pawar | (Photo Credits: ANI)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी (Koregaon Bhima Violence) आज साक्ष नोंदवली जाणार आहे. त्यासाठी शरद पवार यांना समन्स मिळाले असून आज ते या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या निवृत्त न्यायमूर्ती जे.एन. पटेल आयोगासमोर हजर झाले आहेत. चौकशी आयोगासमोर हजर राहण्यााठी शरद पवार यांना तिसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले होते. आयोगाडून 5 आणि 6 मे रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासाठी हे समन्स बजावण्यात आले होते, असे समजते.

भीमा कोरेगाव प्रकरणात शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच एक अतिरीक्त प्रतिज्ञापत्र चौकशी आयोगाला सादर केले होते. याशिवाय प्रत्यक्ष साक्ष नोंदविण्यासाठी ते 23 आणि 24 फेब्रुवारी रोजीच आयोगासमोर हजर होणार होते. मात्र काही कारमांमुळे त्यांना साक्ष देण्यासाठी उपस्थित राहता आले नव्हते. त्यामुळे आयोगाने तिसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले. त्यानंतर पवार हे साक्ष नोंदविण्यसाठी आयोगासमोर उपस्थित राहात आहेत. (हेही वाचा, Video: शरद पवारांच्या बॉलिंगवर पृथ्वीराज चव्हाण यांची दमछाक; फटकावला नाही एकही चेंडू)

कोरेगाव-भीमा येथे 1 जानेवारी 2018 रोजी हिंसाचार झाला होता. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते. राज्यातील सामाजिक शांतता भंग झाली होती. अशा वेळी राज्य सरकारने या हिंसाचाराच्या चौकशीसाठी एक आयोग नेमला होता. दरम्यानच्या काळात या दंगली भडकण्यासाठी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केलेली वक्तव्ये कारणीभूत असल्याचे म्हटले होते. या प्रकरणी अॅड. प्रदीप गावडे यांनी मागणी केली होती की, या प्रकरणात शरद पवार यांचीही साक्ष व्हावी. त्यानंतर आयोगाने पवार यांना समन्स पाठवले.

ट्विट

सध्या भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयए (NIA) करत आहे. असे असले तरी दुसऱ्या बाजूला राज्य सरकारतर्फेही या प्रकरणाची चौकशी सुरु आह. ही चौकशी निवृत्त न्यायमूर्ती जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समिती करत आहे.