कोपरखैराणे येथून ठाणे-पनवेल दिशेने जाणारी वाहतूक पूर्ववत
Mumbai locals | File Image | (Photo Credits: PTI)

कोपरखैराणे येथे ट्रेनचा पेन्टोग्राफ तुटल्याने ठाणे-पनवेल दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. मात्र आता ज्या लोकलचा पॅन्टोग्राफ तुटला होती ती लोकल कारशेड मध्ये पाठवण्यात आली असून या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे.

तसेच हार्बर मार्गावरुन अप आणि डाउन दिशेने जाणारी वाहतूक सुद्धा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना जाण्यासाठी दुसरी लोकल सोडण्यात आली आहे. तर पावसाचा जोर मुंबईसह राज्यभरात अधिकच वाढलेला दिसून येत आहे त्यातच हा प्रकार घडल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.(कोल्हापुरात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय; प्रशासनाकडून रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा)

तर पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दर्शवला होता. त्यामुळे नागरिकांना गरज असल्यास घराबाहेर पडण्याचे आवाहन महापालिकेकडून देण्यात आले आहे.