हाजी असलम सय्यद (Haji Aslam Syed) यांच्या विरोधात कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे दप्तरी बलात्काराचा गुन्हा (Sexually Assaulted) दाखल झाला आहे. हाजी असलम सय्यद हे लोकसभा निवडणूक 2019 मध्ये उमेदवारही राहिले आहेत. ते वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) तर्फे उमेदवार होते. कोविड 19 क्वारंटाईन सेंटरमध्ये परिचय झालेल्या एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन असलम यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. असलम यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची कोठडी मिळाली आहे.
हाजी असलम सय्यद आणि पीडित महिला यांची कोल्हापूर येथील एका क्वारंटाईन सेंटरमध्ये भेट झाली. संबंधीत महिला विधवा आहे. तिच्या पतीचा काही काळापूर्वी निधन झाले आहे. परिचयानंतर दोघांमध्ये काही काळ सलोख्याचे संबंध निर्माण झाले होते. दरम्यान, कल्पावधीत त्यामध्ये दुरावाही आला.
पीडितेने प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, असलम याने पीडितेला विवाहाचे अमिष दाखवले. पीडितेच्या पतीचा विवाह झाल्याने ती नव्याने संसार सुरु करण्याच्या विचारात होती. दरम्यान, तिची भेट असलम याच्यासोबत झाली. त्याने तिला विवाहाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवले. मात्र, पुढे अल्पावधीतच त्याने आपली जबाबदारी झटकत तिच्यापासून दूर राहण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे ध्यानात येताच पीडितेने पोलिसात धाव घेतली. (हेही वाचा, धक्कादायक! नवी मुंबईमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये 40 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर बलात्कार)
दरम्यान, हाजी असलम सय्यद यांनी लोकसभा निवडणूक लढवली आहे. लोकसभा निवडणुकीत ते सर्वाधिक मते मिळवून विजय मिळवू शकले नाहीत. परंतू, त्यांना लक्षवेधी मते मिळाली होती. पोलिसांनी असलम यांना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.