धक्कादायक! नवी मुंबईमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये 40 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर बलात्कार

नवी मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये 40 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरूवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पनवेल पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी अशोक राजपूत यांनी माहिती दिली आहे.

धक्कादायक! नवी मुंबईमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये 40 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर बलात्कार
Rape Case | File Photo

नवी मुंबईतील (New Mumbai) क्वारंटाईन सेंटरमध्ये (Quarantine Centre) 40 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर (COVID19 Positive Woman) बलात्कार (Raped) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरूवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पनवेल पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी अशोक राजपूत यांनी माहिती दिली आहे.

पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील कोरोना संशयित रुग्णांसाठी क्वारंटाईन सेंटरची व्यवस्था इंडिया बुल्स येथे करण्यात आली आहे. या इमारतीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (हेही वाचा - सांगली येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये येणारा 400 वर्षांचा वटवृक्ष वाचविण्यासाठी आदित्य ठाकरे यांची केंद्राला पत्राद्वारे विनंती)

दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोना संशयित म्हणून दाखल झालेल्या एका महिलेवर याच क्वारंटाईन सेंटरमधील आरोपीने बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपीवर कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jul 17, 2020 07:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).