कोल्हापुरातील पाचगाव येथील गाडगीळ कॉलनी एक खळबळजनक घटना घडली आहे. बायकोकडे बघत असल्याच्या संशयावरून एका पोलीस कर्मचाऱ्याने थेट हातात सुरा घेऊन परिसरात दहशत निर्माण केल्याची घटना घडली होती. या पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दरम्यान फिर्यादीने केलेल्या तक्रारीनुसार याप्रकरणी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी यांनी कडक कारवाई करत सदर पोलीस कर्मचाऱ्याला व त्याच्या पत्नीला निलंबित केले आहे. आशुतोष वसंत शिंदे आणि रेश्मा आशुतोष शिंदे अशी निलंबन झालेल्या दोघांची नावे आहेत. (हेही वाचा -Navratri 2023: गुजरातमध्ये नवरात्रीत गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने 24 तासांत 10 जणांचा मृत्यू; जाणून घ्या कशी घ्याल काळजी)
फिर्यादी विनोदकुमार वावरे हे आपल्या आईसह गाडगीळ कॉलनी परिसरात राहतात. त्यांच्या घराशेजारी पोलीस कॉन्स्टेबल आशुतोष शिंदे कुंटुबियांसमवेत राहतात. कोल्हापूर पोलीस दलात काम करणारे शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल आशुतोष वसंत शिंदे आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेली त्यांची पत्नी रेश्मा आशुतोष शिंदे हे दोघे नेहमी किरकोळ कारणावरून कॉलनीतील लोकांशी वाद घालत असत.
या ठिकाणी वाद मिटवण्यासाठी आलेल्या विनोदकुमार वावरे यांच्या नातेवाईकांनाही मारहाण करून शिवीगाळ केली. यामुळे, विनोदकुमार वावरे यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या घटनेची गंभीर दखल घेत आता दोघा पोलीस पती-पत्नीचे निलंबन केले आहे.