कोल्हापूर मध्ये 19 जुलै पासून दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी, व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासनाचा आदेश
Shops | Representational Image | (Photo Credits: ANI)

कोरोनाची दुसरी लाट अद्याप कायम असून लॉकडाउनचे निर्बंध राज्यातील काही ठिकाणी शिथील करण्यात आलेले नाहीत. अशातच कोल्हापूर मधील व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्यासाठी आक्रमक भुमिका घेतली होती. त्यांनी असे म्हटले होते की, कोणत्याही परिस्थितीत दुकाने उघडणार. तेव्हा पोलीस किंवा लष्कर जरी आले तरीही पर्वा करणार नाही असे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले होते. याच पार्श्वभुमीवर आता कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने सोमवार (19 जुलै) पासून व्यापाऱ्यांना दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे.

कोल्हापूरमध्ये सोमवार पासून तिसऱ्या टप्प्यातील नियम लागू केले जाणार आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांचा पॉझिटिव्ह रेट वाढला होता. पण आता तो कमी झाल्यानंतर दुकाने उघडण्याची परवानगी दिली गेली आहे. तर बुधवारी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. पण सरकारकडून त्यांच्यासंदर्भात कोणत्याही निर्णयाची घोषणा करण्यात आली नाही. त्यानंतर व्यापाऱ्यांनी सरकारची संवेदनशीलता कुठे हरवली असा सवाल उपस्थितीत केला होता.(Door-To-Door Covid-19 Vaccination: मुंबईत अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांचे घरोघरी जावून लसीकरण; BMC ने जारी केला ईमेल आयडी)

पण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्र्यांकडून घेतला जाईल असे सांगण्यात आले होत. यावरुन सुद्धा व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत सरकारची ही दुटप्पी भुमिका असल्याचे म्हटले होते. तर दुसऱ्या बाजूला लसीचे पुरेसे डोस उपलब्ध होत नसल्याचे लसीकरण कसे होणार असा प्रश्न ही विचारला होता. पण आता दुकाने सुरु करण्यास परवानगी दिल्याने व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.