Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

कोल्हापूर (Kolhapur) आणि सांगली (Sangli) येथे आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या गंभीर परिस्थितीची मधून बाहेर येण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तर मराठी कलाकारांनी कोल्हापूर आणि सांगली येथील पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला असून त्यांच्यासाठी ट्रक भरुन जीवनावश्यक गोष्टी त्यामधून पाठवल्या होत्या. मात्र आज या ट्रकला अपघात झाल्याची घटना घडली असून यामध्ये कोणतीही जीवतहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला असून ट्रक भरुन पुरग्रस्तांसाठी मराठी कलाकारांनी दिलेल्या जीवनावश्यक वस्तू त्यामध्ये होत्या. मात्र दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने ही घटना घडली आहे. मराठी कलाकारांकडून पुगग्रस्तांसाठी 10-12 ट्रक भरुन सामान पाठवले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.(पुरग्रस्तांसाठी मुंबई विद्यापीठाकडून 25 लाखांची मदत जाहीर, नुकसान झालेल्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करणार)

तर पुरग्रस्तांचे जीवन पुन्हा एकदा सुरळीत करण्यासाठी राजकीय नेते मंडळीसुद्धा मदत करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्र सरकारकडे 600 कोटी रुपयांची मागणी या पुरग्रस्तांसाठी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच काही संस्था आणि नेत्यांनी पुराचा फटका बसलेल्या गावांना दत्तक घेतले असून तेथील परिस्थिती पुर्ववत करण्याचा प्रयत्न करणार आहेत.