
Kolhapur News: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील कागल तालुक्यात दोन चिमुकल्या सख्ख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू (death) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना 17 जानेवारी रोजी झाली. आराध्या सुरेश भोसले आणि आरोही सुरेश भोसले अशी विहिरीत पडून मृत झालेल्या मुलींची नावे आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- पाण्यासाठी वणवण करणाऱ्या आईसाठी खोदली विहीर, )
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरातील राधानगरी तालुक्याचील कसबा वाळवे या ठिकाणी ही दुर्घटना घडली. आई वडिलांसोबत गावातील शेतात ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान वडिलांनी दोघी मुलींना घरी जाण्यास सांगितले होते. शेतीला पाणी देऊन झाल्यानंतर मुलींची आई सुध्दा घरी गेली होती. घरी गेल्यानंतर आईने मुलींना आवाज दिला.घरात कोणीच नसल्याचे दिसून आल्यानंतर आई घाबरली. तिचा जीव कासाबीस झाला आणि तिनं पुन्हा शेताकडे धाव घेतला आणि मुलींना आवाज दिला. मुली कुठेचं नसल्याची घटना तिनं पतीला सांगितली. दोघांनी शेतात शोध घेतला
त्यानंतर दोघांच्या चप्पला या शेतातील विहिरीजवळ सापडल्या. ही घटना गावकऱ्यांना सांगण्यात आली. गावकऱ्यांनी विहिरी उतरून मुलींचा शोध घेतला. काही वेळानंतर दोन्ही मुलींचा मृतदेह सापडला. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.