Political Party | Representational Image (Photo credits: Pixabay)

राज्याच्या राजकारणात आणखी एका नव्या पक्षाचा उदय झाला आहे. निवडणूक आयोगाने या पक्षाला मान्यताही दिली आहे. 'आमचं ठरलंय विकास आघाडी' (Aamcha Tharlay Vikas Aghadi) असे या राजकीय पक्षाचे नाव आहे. विशेष म्हणजे हा पक्ष अल्पवाधतीच निवडणुकीच्या रिंगणातही उतरणार आहे. आगामी काळात पार पडणाऱ्या कोल्हापूर महापालिका निवडणूक 2020 (Kolhapur Municipal Corporation Election) मध्ये हा पक्ष आपले उमेदवार उतरवणार असल्याचे समजते. या पक्षाचा झेंडा आणि निवडणूक चिन्ह काय असेल याबाबत अद्याप समजू शकले नाही.

लोकसभा निवडणकू 2019 ( Lok Sabha Elections 2019 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 'आमचं ठरलंय' (Aamcha Tharlay) ही घोषणा पहिल्यांदा हिट झाली आणि पुढे तिला महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळाली. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) व माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यातील राजकारणाची किनार या घोषणेला होती.

गृहराज्यमंत्री सतेज पाटील व माजी खासदार धनंजय महाडिक हा वाद खरे तर कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक पातळीवरचा. सतेज पाटील काँग्रेस पक्षाचे तर धनंजय महाडिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. महाडिक तेव्हा राष्ट्रवादीचे उमेदवार होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी होती. त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादी पक्षाला मदत करावी असे अपेक्षीत होते. मात्र तसे न होता पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी महाडीक विरोधात काम केले. परिणामी शवसेनेचे धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik) खासदार म्हणून निवडूण आले. (हेही वाचा, 'आमचं ठरलंय' ते आमचं तुटतंय? भाजपच्या फुग्याला शिवसेनेची टाचणी? काँग्रेस, राष्ट्रवादी पाहतंय दुरुन मजा)

दरम्यान, 'आमचं ठरलंय' या घोषणेची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही घेतली. या घोषणेला प्रत्युत्तर देताना 'तुमचं ठरलंय तर मी पण ध्यानात ठेवलंय' असे पवार यांनी म्हटले. त्यामुळे ही घोषणामहाराष्ट्राच्या राजकारणात अधिकच हिट झाली. शिवसेना-भाजपचे प्रमुख नेतेही जागावाटप आणि सत्तावाटपाचे काय तर आमचं ठरलंय अशी प्रतिक्रिया देत होते.