कोल्हापूर:  महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा मंदिरातील सोन्या- चांदीचे मूल्यांकन पूर्ण; अंबाबाईच्या सोन्यात वर्षभरात वाढ तर चांदी घटली
कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर(Photo credits: Kolhapur Tourism)

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील (Mahalaxmi Mandir)  यंदाचा सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या मूल्यांकनाचा कार्यक्रम पार पडला आहे. 2018-19 या वर्षात देवीच्या खजिन्यात 1 कोटी 9 लाख 75 हजार रूपयांचे दागिने आले आहेत. तर उत्पन्नात 1 कोटी 56 लाख रूपयांची वाढ झाल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मीडियाशी बोलताना दिली आहे. कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिरामधील गरूड मंडपातील खाजगी अभिषेक बंद

करवीर निवासिनी अंबाबाईच्या सोन्या -चांदीच्या दागिन्यांच्या मूल्यांकनाला 17 जून 2019 ला सुरूवात झाली. हे मूल्यांकन मुंबई सरकारी मूल्यांकनकार पुरूषोत्तम काळे यांच्यासह विशेष सराफांकडून करण्यात आलं. यंदा सोन्यामध्ये 800 ग्रॅम वाढ झाली असून चांदी घटली आहे.

करवीर निवासीनीप्रमाणे ज्योतिबाच्या दागिन्यांचे आणि उत्पादनाचेही मूल्यांकन करण्यात आलं आहे. यामध्ये सोन्याचे मूल्यांकन 5 लाख पन्नास हजार तर चांदीचे मूल्यांकन 62,312 रूपये इतके झाले आहे.