Kohinoor Mill Case: राज ठाकरे यांना ईडीकडून कोहिनुर मिल प्रकरणी नोटीस आल्यानंतर मनसैनिक आक्रमक, बेस्ट बसला लावल्या जाळ्या
BEST bus (Photo Credits: PTI)

कोहिनुर मिल प्रकरण: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thckeray) यांना मुंबईतील शिवाजी पार्क येथील कोहिनुर मिल (Kohinoor Mill) प्रकरणी ईडीकडून नोटीस आली आहे. त्यामुळे मनसैनिक संतापले आहेत. परंतु राज ठाकरे यांनी सुद्धा एक पत्रकाद्वारे कोणीही आक्रमक होऊ नये असे सांगितले आहे. तर 22 ऑगस्ट रोजी राज ठाकरे यांची कोहिनुर मिल प्रकरणी ईडीची चौकशी करण्यात येणार आहे.तत्पूर्वी पोलिसांकडून मनसैनिकांना पोलिसांकडून नोटासा पाठवण्यात आल्या आहेत. तसेच बेस्टला सुद्धा जाळ्या लावण्यात आल्या आहेत.

तसेच राज ठाकरे राहत असलेल्या शिवाजी पार्कच्या परिसरात एका पोस्टरद्वारे मनसैनिकांनी त्यांना पाठिंबा देत असल्याचे म्हटले आहे. तर दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या ईडीच्या चौकशीवेळी ठाणे बंदच आवाहन जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केले होते. तसेच मनसैनिकांना यामध्ये सहभागी व्हावे असे सुद्धा सांगण्यात आले होते. त्याचसोबत राज ठाकरे यांच्यावर राजकीय दबाब आणला जात असल्याचे ही बोलण्यात येत होते.(Kohinoor Mills Case: उद्धव ठाकरे यांच्याकडून राज ठाकरे यांची पाठराखण, ईडीच्या नोटीशीबद्दल काय म्हणाले पाहा)

मात्र उद्या ईडीच्या चौकशीवेळी मनसैनिकांनी शांतता राखा असे सुद्धा आवाहन राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आले आहे.तसेच सामान्य नागरिकांना मनसैनिकांचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या असे सुद्धा सांगण्यात आले आहे. तर ईडीची नोटीस आल्यानंतर ठाणे येथील एका तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रयत्न केल्याची घटना सुद्धा समोर आली आहे.