(Archived, edited, symbolic images)

ठाणे (Thane) जिल्ह्यातील उल्हासनगर (Ulhasnagar) शहरात शुक्रवारी दोन गटांतील मारामारी थांबवताना एका पोलीस कॉन्स्टेबलच्या (Police Constable) चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. पैशाच्या वादातून दोन्ही गट भांडत होते. जेव्हा पोलीस कॉन्स्टेबल गणेश डमाळे (Police Constable Ganesh Damale) त्यांच्या सहकाऱ्यासह घटनास्थळी पोहचले आणि लढा थांबवला. मात्र एका आरोपीने त्याच्या चेहऱ्यावर चाकूने वार केले. मारामारी दरम्यान संजय चितलानी आणि अविनाश नायडू या इतर दोन व्यक्तींनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या मुंबईतील जेजे रुग्णालयात (JJ Hospital) उपचार सुरू आहेत. स्थानिक विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनने (Vitthalwadi Police Station) नरेश लेफ्टी, ओमी आणि शशी चिकना उर्फ ​​सुखी यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला असून या तिघांचा शोध सुरू आहे.

पोलीस स्रोतांनी सांगितले की, क्रिकेट सट्टेबाजीच्या व्यवसायाशी निगडित नरेशकडे संजयचे काही पैसे होते. तसेच तो त्याच्याकडून तशी मागणी करत होता. दोन्ही पक्ष शुक्रवारी पहाटे 2 च्या सुमारास उल्हासनगर 4 मधील सेक्शन 30 जवळ भेटले.  जिथे अविनाश जो एक नेहमीचा गुन्हेगार आहे. त्याने नरेशला पैशांसाठी आणखी काही महिने थांबायला सांगितले. ज्यामुळे नंतर राग आला. हेही वाचा Child Prisoner Quarrel In Aurangabad Jail: जेवण मिळण्यास विलंब झाल्याने औरंगाबादमधील जेलमध्ये बाल कैद्यांचा राडा

नरेशने संजय आणि अविनाशवर चाकूने हल्ला केला. यात ते दोघेही जखमी झाले.  कॉन्स्टेबल दमाळे यांना भांडणाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचून थांबण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याऐवजी नरेशने त्या ठिकाणाहून पळून जाण्यापूर्वी त्याच्या तोंडावर वार केले. नंतर अधिक पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणाचा अधिक कसून तपास पोलिस करत आहेत. तसेच प्रकरणातील आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.