Mayor Kishori Pednekar (Photo Credits-ANI)

Kishori Pednekar on Kumbh Mela: देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा तुफान वाढत चालला आहे. त्यामुळे राज्यात येत्या 30 एप्रिल पर्यंत कठोर लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशातच नुकत्याच समोर आलेल्या कुंभमेळ्या संदर्भातील बातमीनुसार अधिक चिंता व्यक्त केली जात आहे. कारण कुंभ मेळ्यातील बहुतांश जणांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. याच पार्श्वभुमीवर मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कुंभ मेळ्यासंदर्भात एक विधान केले आहे.

ANI सोबत बोलताना किशोरी पेडणेकर यांनी असे म्हटले आहे की, जे लोक कुंभ मेळ्यावरुन संबंधित राज्यात परतत आहेत त्या राज्यांना कोरोना हा प्रसाद म्हणून मिळणार आहे. या सर्व नागरिकांनी संबंधित राज्यात स्वत:च्या पैशांनी क्वारंटाइन व्हावे. तर मुंबईत सुद्धा आम्ही त्या लोकांना क्वारंटाइमध्ये ठेवण्याचा विचार करत असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले आहे.(Coronavirus: मुंबई, पुणे नव्हे महाराष्ट्रात 'या' शहरात आहे COVID 19 चा प्रादुर्भाव)

तसेच मुंबईतील 95 टक्के नागरिकांकडून कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात आहे. मात्र 5 टक्के लोकांकडून त्याचे उल्लंघन केले जात असल्याने याचा अन्य जणांवर परिणाम होत आहे. त्यामुळे मला असे वाटते की संपूर्ण लॉकडाऊन लागू करावा असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.(Haffkine Institute ला लस उत्पादनाची परवानगी मिळताच श्रेयवादाच्या लढाईला सुरुवात? 'ठाकरे ब्रँड' म्हणत मनसेचं ट्विट)

Tweet:

महाराष्ट्रात सातत्याने वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची सख्या चिंताजनक आहे. राज्यात तब्बल 63 हजार 729 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 398 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या 37 लाख 3 हजार 584 वर पोहचली आहे. यातील 30 लाख 4 हजार 391 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 59 हजार 551 जणांचा मृत्यू झाला आहे.