Kirit Somaiya Viral Video Case: महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयाकडून  मुंबई पोलीस आयुक्तांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश
Rupali Chakankar | (Photo Credit: FB )

महाराष्ट्र राज्य पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस हा किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या आक्षेपार्ह वायरल व्हिडिओ मुळे चर्चेत राहिला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सखोल आणि वरिष्ठ दर्जाची चौकशी केली जाईल असं म्हटलं आहे. त्यानंतर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी देखील महिला आयोगाकडून मुंबईच्या पोलीस आयुक्तांना (Mumbai Police Commissioner) पत्र पाठवत या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करुन वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आल्या आहेत.

दरम्यान आज विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी एक पेनड्राईव्ह सभागृहाच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांना दिला आहे. यावेळेस त्यांनी दावा केला आहे की किरीट सोमय्या यांनी धमकावून किंवा भीती दाखवून काही मराठी भगिनींचे शोषण केले आहे. त्याच्या काही क्लिप्स यामध्ये आहेत. यावर बोलताना नीलम गोर्‍हे यांनी संबंधित महिलांनी समोर येऊन पोलिसांत याबद्दल तक्रार द्यावी. अद्याप कुणीही समोर न आल्याने यावर कारवाई कशी करता येईल?  नक्की वाचा: ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून किरीट सोमय्यांच्या फोटोला जोडे मारा आंदोलन.

पहा पत्र

किरीट सोमय्या यांनी सवतःहून देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित चौकशी करण्याची विनंती केली आहे. हा प्रकार काल लोकशाही वृत्तवाहिनीने टीव्हीवरून प्रकाशझोकात आणला त्यानंतर आता त्याची चर्चा प्रत्येक सोशल मीडीया प्लॅटफॉर्म तसेच विधिमंडळात होताना दिसली आहे.