Kirit Somaiya | (Photo Credit - Twitter/ANI)

राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारी घटना समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांचा कथित व्हिडिओ लीक झाला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. अनेक राजकीय नेत्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे. हा मुद्दा आपण अधिवेशनात उचलणार असल्याचं अंबादास दानवेंनी सांगितले. या विरोधात (Kalyan) कल्याणात ठाकरे गट महिला आघाडीकडून किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मार आंदोलन करत पोस्टर पायदळी तुडवत निषेध व्यक्त केला.   (हेही वाचा  - Kirit Somaiya On Viral Video: व्हायरल व्हिडिओ प्रकरणी चौकशी करण्याची किरीट सोमय्यांची मागणी, देवेंद्र फडणवीसांना लिहले पत्र)

या व्हायरल व्हिडिओवरुन ठाकरे गट चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. किरीट सोमय्या यांच्या कथित वादग्रस्त व्हायरल व्हिडिओप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करत किरीट सोमय्या विरोधात ठाकरे गटाकडून आंदोलन छेडण्यात आले आहे. कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे महीला आघाडीच्यावतीने किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन करत फोटो पायदळी तुडवत निषेध नोंदवण्यात आला.