राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारी घटना समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा कथित व्हिडिओ लीक झाला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. दरम्यान आपल्याकडून कोणत्याही महिलेवर अन्याय झाला नसल्याचे किरीट सौमय्यांनी म्हटले आहे. तशीच अशा आरोप करणाऱ्या व्हिडिओची सत्यता तपासण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली असून यांसदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पत्र लिहले आहे.
पाहा पोस्ट -
एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहे
माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाही
अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी चौकशी करावी @Dev_Fadnavis यांना विनंति pic.twitter.com/Q1YLoP0ZUi
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)