Devendra Fadnavis | Twitter/ANI

भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओचे पडसाद आज विधिमंडळात देखील पहायला मिळाले. दरम्यान राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांनी त्याबाबत विधानपरिषदेमध्ये बोलताना ' हा प्रकार गंभीर आहे. अशा गोष्टींमुळे एखाद्या व्यक्तीची सारी राजकीय कारकीर्द पणाला लागू शकते त्यामुळे कुणाकडे ठोस पुरावे, माहिती असल्यास आम्हांला द्या. त्याचा नक्कीच तपास केला जाईल' असं म्हटलं आहे.

किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणी आम्ही गृहतिकांवर तपास करू शकत नाही. तसेच यामध्ये महिलेचा समावेश असल्यास तिची देखील ओळख पटवली जाईल. पण ती जाहीरपणे सांगू शकत नसल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. परंतू या प्रकरणाची सखोल आणि वरिष्ठ स्तरावर चौकशीचा शब्द त्यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना दिला आहे. नक्की वाचा: ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून किरीट सोमय्यांच्या फोटोला जोडे मारा आंदोलन.

पहा ट्वीट

ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांची सुरक्षा काढण्याची मागणी केली आहे. "आज त्यांनी जे पत्र दिलं आहे त्यामध्ये सोमय्यांनी हा व्हिडीओ खोटा आहे असं कुठेही म्हटलं नाही. त्यांनी म्हटलं आहे की मी कुणावर अत्याचार केला नाही याचा अर्थ हा व्हिडीओ खरा आहे. तात्काळ गृहमंत्र्यांनी किरीट सोमय्या यांची सुरक्षा काढावी." असं परब यांनी म्हटलं आहे.