वर्षअखेरीस उरण ते खारकोपर रेल्वे सेवा प्रवाशांसाठी होणार खुली
Mumbai Local | Representational Image | (Photo credits: PTI)

Uran-Khar Kopar Railway Line: मुंबईप्रमाणे आता नवी मुंबईचादेखील विकास झपाट्याने होत आहे. काही महिन्यांपूर्वी नेरूळ ते खारकोपर (Nerul - Khar Kopar) हा रेल्वेमार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर आता वर्षअखेरीस उरण ते खारकोपरच्या (Uran-Khar Kopar) मार्गाचं कामं पूर्ण होणार आहे. त्यामुळे या वर्ष अखेरीस नवी मुंबईकरांना लोकलच्या माध्यमातून थेट उरण (Uran) गाठता येणार आहे.  नक्की वाचा: नेरुळ- बेलापूर-खारकोपर लोकल वेळापत्रक; उलवेसह नवी मुंबईकरांनाही फायदा

कसा असेल खारकोपर ते उरण प्रवास?

नेरूळ-उरण रेल्वेमार्गावर अनेक कामं प्रस्तावित आहेत. रेल्वे आणि सिडकोच्या मदतीने हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. रात्रंदिवस कामगार यासाठी मेहनत करत आहेत. सध्या या मार्गाच काम अंतिम टप्प्यात आहे. नेरूळ-उरण रेल्वेचा प्रकल्प गेल्या दहा वर्षांपासून रखडला आहे. सुरुवातीला अंदाजे 500 कोटी खर्च अपेक्षित असलेला हा प्रकल्प आता 1782 कोटींवर गेला आहे. या रेल्वेमार्गाची लांबी 27 किलोमीटर आहे. या मार्गावर 7 लहान लहान ब्रीज आहेत. खारकोपर ते उरण मार्गावर पाच रेल्वे स्थानकं असतील. सुरूवातीला मार्च महिन्यापर्यंत हे काम पूर्ण केले जाईल असा विश्वास होता. मात्र आता या कामाची डेडलाईन वर्षअखेरीपर्यंत गेली आहे.

सध्या उरणमध्ये पोहचण्यासाठी जलवाहतूक किंवा रस्तेमार्गाने जावे लागते. या नव्या रेल्वे सेवेमुळे आता उरण लोकलच्या माध्यमातून जोडलं जाणार आहे.