कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून (KDMC) गुरुवारी दोन खासगी हॉस्पिटलचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. या संबंधित मनसेचे नेते राजेश कदम यांनी असा दावा केला होता की, हे दोन्ही रुग्णालय बनावट डॉक्टरांकडून चालवण्यात येत असल्याचे म्हटले होते. कल्याण पश्चिम येथील खडकपाडा मधील साई लिला हॉस्पिटल आणि कल्याण पूर्व येथील माऊली रुग्णालय यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी या प्रकरणी असे म्हटले की, ही दोन्ही रुग्णालये डॉक्टरांच्या नावाने रजिस्ट्रर केले होते. पण रुग्णालयांनी अमित शाहू या व्यक्तीकडून ही रुग्णालये चालवण्यात येत असून तो डॉक्टर्स नसल्याच्या तक्रारी आल्या. त्यामुळे केडीएमसी कडून नोटीस पाठवण्यात आली पण त्याला काहीच त्यांनी उत्तर दिले नाही.(मुंबई: कोरोनाबाधित रुग्णांकडून अतिरिक्त बिलाचे पैसे घेतल्याने माहिम मधील रुग्णालयाचा महापालिकेकडून परवाना रद्द)
कदम यांनी असे म्हटले की, कल्याण-डोंबिवली महापालिकेने केलेल्या कारवाईचे स्वागत केले आहे. पण आरोग्य अधिकाऱ्यांनी रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला गेल्याने या दोन्ही रुग्णालयांच्या विरोधात एफआयआर दाखल करावी असे ही स्पष्ट केले आहे. साई लिला रुग्णालयाचे डॉ. बीबी कुलकर्णी यांनी म्हटले की, रुग्णालयाचे महापालिकेत रजिस्ट्रेशन केले आहे. पण आम्हाला कोणतेच निलंबित पत्र आले नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. त्याचसोबत डॉ. माऊली वाणी, ज्यांच्या नावावर माउली रुग्णालय आहे त्यांना सुद्धा संपर्क करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट केले आहे.(COVID-19: कोरोनाबाधित रुग्णांकडून अधिक पैसे उकळत असल्याने एका खाजगी रुग्णालयाचा परवाना निंलबित; ठाणे शहरातील नागरी संस्थेची कारवाई)