KDMC Elections 2020: कल्याण-डोंबिवली महानगपालिका निवडणुकीची प्राथमिक कामे सुरु करावीत, राज्य निवडणूक आयोगाची सूचना
Kalyan Dombivli Municipal Corporation | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission)  कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) अधिका-यांना ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकांची (KDMC Elections 2020) तयारी सुरू करावी अशी सुचना केली आहे. याबाबत हिंदुस्थान टाइम्सने माहिती दिली आहे. या निवडणुका एप्रिल मे मध्ये व्हायच्या होत्या मात्र कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव लक्षात घेता या निवडणुकीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता लॉक डाऊन 5.0 दरम्यान, अनेक सरकारी कामांना मार्गी लावण्याची परवानगी देण्यात आली आहे, यानुसार निवडणूक आयोगाने 19 जून रोजी केडीएमसी ला एक पत्रक पाठवून त्यांच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या 122 वार्ड मधील रखडलेली प्राथमिक कामे सुद्धा सुरु करण्यास सांगितले आहे.

Rajya Sabha Election Results 2020: काँग्रेसला राजस्थान मध्ये 2 जागा, गुजरात मधून भाजपला 3 जागा आणि MP, YSRCP यांचा आँध्र प्रदेशातील 4 पैकी 4 जागांवर विजय, येथे पहा निवडणूकीचा संपूर्ण निकाल

कडोमपा सचिव संजय जाधव यांनी निवडणूक आयोगाच्या पत्राविषयी माहिती दिली, नागरी निवडणुकांसाठी ड्राफ्ट बनवण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत आणि त्या अनुषंगाने लवकरच निर्णय घेतला जाईल असे जाधव यांनी सांगितले. राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला प्राथमिक कामे करताना सरकारच्या अनलॉक 1.0 - मिशन बिग अगेन अभियानांतर्गत जाहीर केलेल्या सर्व प्रोटोकॉलचे पालन करण्याचे विशेष आवाहन केले आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने अद्याप मतदानाची तारीख सांगितलेली नाही. प्राथमिक कामात नगरपालिका प्रभागांच्या मर्यादा निश्चित करणे, प्रभागांचे आरक्षण ठरवणे इत्यादी कामांचा समावेश आहे. याशिवाय पालिका कार्यालयाच्या हद्दीत आणि मतदारांशी संपर्क न घेता करता येतील असे उपक्रम राबविण्यासाठी मान्यता दिली आहे.पालिकेने निवडणुकीचे प्राथमिक काम पूर्ण केल्यानंतर राज्य निवडणूक आयोग प्रमुख यूपीएस मदन यांना माहिती द्यायची आहे.

अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केडीएमसीच्या अखत्यारीत येणाऱ्या 27 गावांपैकी 18 खेड्यांचा समावेश असणारी एक स्वतंत्र नागरी संस्था स्थापन केली जाईल आणि उर्वरित 9 गावे ही केडीएमसीचा भाग राहतील असे सांगितले होते, येऊ घातलेल्या निवडणुकांपूर्वीच हे वर्गीकरण येणार असल्याने बहुतेक प्रभागांची हद्द बदलणार आहे. या सगळ्यासाठी काही वेळ आवश्यक आहे असे महापौर विनिता राणे यांनी सांगितले होते.