Kashif Khan (Photo Credits-Twitter)

Kashif Khan on Drugs Case: मुंबईतील क्रुज पार्टी ड्रग्ज प्रकरणी महाराष्ट्र मंत्री नवाब मलिक यांनी सातत्याने एका दाढीवाल्या व्यक्तीचा उल्लेख केला. त्यानंतर आज अखेर मलिक यांनी त्याचे नाव काशिद खान असल्याचा खुलासा केला. काशिफ खान हा फॅशन टीव्हीचा एमडी मॅनेजिंग डायरेक्टर आहे. पहिल्यांदा काशिद खान याने एबीपी सोबत केलेल्या एक्सक्लूसिव बातचीत मध्ये असे म्हटले की, मी या सर्व आरोपांचे खंडन करतो. तर नवाब मलिक यांनी दिलेली माहिती चुकीची असून लावण्यात आलेले आरोप ही खोटे आहेत.(Drugs Case: क्रुजवरील दाढीवाला काशिफ खान असल्याचा खुलासा, नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केले 'हे' गंभीर आरोप)

काशिफ खान याने पुढे असे म्हटले की, क्रुजवर हत्यारे घेऊन जाण्याची बाब चुकीची आहे. मला कळत नाही नवाब मलिक असे का करत आहेत. माझ्यावर लावण्यात आलेले आरोप हे पूर्णपणे खोटे आहेत. ड्रग्ज सोबत माझे काही घेणेदेणे नाही. मी सिगरेट सुद्धा ओढत नाही. मी कोणत्याही पार्टीचे आयोजन सुद्धा केले नव्हते. क्रुजवरील पार्टी ही दिल्लीतील एका इवेंट कंपनीने आयोजित केली होती.(Samir Wankhede on Nawab Malik: काशिफ खान याच्या अटकेवरुन नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपावर समीर वानखेडे यांनी मीडियाला दिली प्रतिक्रिया)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी फॅशन टीव्ही इंडियाचे प्रमुख काशिफ खान याच्या अटकेची मागणी केली. खान हा तोच दाढीवाला व्यक्ती आहे ज्याची ओळख मलिक यांनी क्रुज पार्टीचा चीफ ऑर्गेनाइजरच्या रुपात केली होती. त्याचसोबत मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर ही हल्लाबोल केला. त्यांनी असे म्हटले की, वानखेडे आणि काशिद खान यांच्यात उत्तम संबंध आहेत.