Drugs Case: क्रुजवरील दाढीवाला काशिफ खान असल्याचा खुलासा, नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केले 'हे' गंभीर आरोप
Nawab Malik | ( Photo Credits: ANI))

Drugs Case: ड्रग्ज प्रकरणी महाराष्ट्र सरकार मधील मंत्री नवाब मलिक यांची आज पुन्हा पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. यामध्ये नवाब मलिक यांनी क्रुजवर ज्या दाढीवाल्या व्यक्तीचा दावा केला होता त्याचे नाव त्यांनी उघड केले आहे. नवाब मलिक यांनी असे म्हटले की, त्या व्यक्तीचे नाव काशिफ खान आहे. तो फॅशन टीव्हीच्या इंडियातील प्रमुख आहे. जो क्रुजवर इवेंट्स आयोजित करत होता. त्याचसोबत काशिफ खान हा सेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर ही हल्लाबोल केला आहे.

मलिक यांनी पुढे दावा केला की, काशिफ खानच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक व्हिडिओ मिळाला आहे. जो संध्याकाळी 6 वाजून 23 मिनिटांनी आपल्या गर्लफ्रेंडसोबत क्रुजवर दिसून येत आहे. मी समीर वानखेडे यांना त्यांनी दाढीवाल्या व्यक्तीची चौकशी का केली नाही किंवा त्याला अटक का झाली नाही असे विचारले होते. हा दाढीवाला फॅशनच्या नावाखाली देशात ड्रग्ज, पोर्नोग्राफीचे रॅकेट चालवतो. समीर वानखेडे सोबत काशिफ खान याचे उत्तम संबंध आहेत. नवाब मलिक यांच्या मते, एका अधिकाऱ्याने त्यांना सांगितले की बहुतांश वेळा त्यांनी काशिफ खानवर छापेमारी करण्यास सांगितली. पण समीर वानखेडे यांनी ती थांबवली.(Kiran Gosavi Arrested: किरण गोसावी याला 5 नोव्हेंबरपर्यंत सुनावली पोलीस कोठडी)

तुम्ही पाहिले असेल आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. जो व्यक्ती आर्यन खान याला वारंवार एनसीबी कार्यालयात आणत होता तो आता तुरुंगात आहे. त्याचसोबत जो माणूस आर्यन खान आणि इतरांना जामीन मिळू नये यासाठी सर्व काही करत होता, तोच आज न्यायालयाचा दरवाजा ठोठावत होता असे ही नवाब मलिक यांनी म्हटले आहे. (Prabhakar Sail, NCB पंच विरोधात Sam D'Souza म्हणून Hainik Bafna चा फोटो दाखवल्याचा दावा; पालघर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल)

Tweet:

दरम्यान, पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवेशनात मोठी नावे समोर येतील असे यांनी सुचक विधान केले आहे. तसेच काशिफ खान याला अटक केल्यानंतर भाजपच पितळ उघड पडेल असे ही नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.काशिफ खान नंतर समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधत मलिक यांनी म्हटले की, ड्रग्ज केसमध्ये लोकांना पडकणारे आता बचावाचा मार्ग शोधत आहेत.