Kartiki Ekadashi 2020: कार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सपत्निक विठ्ठल-रखुमाईची शासकीय पूजा संपन्न;  कोरोना संकट दूर करण्यासाठी साकडं
Kartiki Ekadashi Puja| Photo Credits: Ajit Pawar

महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री आणि कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) दिवशी उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय पूजा करण्याचा मान असतो. या नियमाप्रमाणे यंदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांच्या हस्ते पंढरपूरात (Pandharpur) शासकीय पूजा संपन्न झाली आहे. यावेळेस त्यांच्यासोबत पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) , चिरंजीव पार्थ पवार, जय पवार देखील उपस्थित होते. कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे, असं साकडं विठ्ठलाच्या चरणी घातलं. असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान राज्यातील कोरोना संकटाचा प्रभाव यंदा कार्तिकी एकादशीवरही पहायला मिळाला आहे. सध्या पंढरपूरात संचारबंदी आहे. विठ्ठलाच्या गाभार्‍यात आणि मंदिरात देखील मर्यादीत प्रवेश देण्यात आले होते. Kartiki Ekadashi 2020 Wishes In Marathi: कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Messages द्वारा देत खास करा विठू भक्तांंचा आजचा दिवस

श्री विठ्ठल कोरोनाचे संकट दूर करेलच, अशी समस्त भाविकांप्रमाणेच माझीही श्रध्दा आहे. पण सर्व काही पांडुरंगावर सोडून चालणार नाही. आपणा सर्वांना कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी मास्क वापरणं, गर्दी टाळणं, वारंवार हात धुणं आदी गोष्टी काटेकोरपणे अमलात आणाव्या लागतील. असे देखील अजित पवार म्हणाले आहेत.

Ajit Pawar Tweet

दरम्यान यंदाच्या कार्तिकी एकादशीला कवडुजी नारायण भोयर आणि त्यांच्या पत्नीला मानाचे वारकरी हा मान मिळाला होता. अजित पवारांनी आज विठ्ठल मंदिरात त्यांचा सत्कार केला. त्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात येणार प्रवास सवलत पास सुपूर्त करण्यात आला.