Kalyan: शिवसेना नेत्याच्या मुलीच्या लग्नात शंभर जणांची उपस्थिती, कोविडच्या नियमांचे उल्लंघन केल्याने 3 जणांच्या विरोधात कारवाई
Image For Representation (Photo Credits: Pixabay)

Kalyan: राज्यात वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन करण्याचा विचार करत आहेत. अशातच आता शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनिल वायले यांच्या मुलीच्या लग्नात शंभर लोकांनी उपस्थिती लावल्याने कारवाई करण्यात आली आहे. ही घटना कल्याण येथे घडली आहे. शनिवारी लग्नसमारंभ पार पडला. त्यामुळे लग्नात फक्त 50 जणांचा उपस्थिती लावण्याची परवानगी आहे. मात्र अधिक लोकसंख्येने नागरिक उपस्थिती होतेच आणि त्यांनी मास्क न घालण्यासह सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.(मुंबईतील विमानतळांवर COVID19 च्या नियमांचे उल्लंघन केल्यास 1 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार)

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या लग्न समारंभाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी वायले यांच्यासह 3 जणांच्या विरोधात कारवाई केली आहे. याआधी सुद्धा कल्याणमध्ये अशाच पद्धतीचा प्रकार घडला होता. त्यावेळी ही शिवसेना नेत्याच्या लग्नात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते.(महाराष्ट्रात पूर्णपणे लॉकडाऊन नाही, पण रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत संचारबंदी लागू असणार- अस्लम शेख) 

दरम्यान, लग्नाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी वायले यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. तसेच कोरोनाचे नियम फक्त सामान्यांनाच लागू होतात का? असा सवाल सुद्धा सोशल मीडियात उपस्थितीत केला. अशा राजकीय नेत्यांमुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होते आणि सामान्यांना त्याचा फटका बसतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षातील नेत्यावर कारवाई करणार का असे सुद्धा प्रश्न उपस्थितीत नागरिकांनी केला. तर मुंबई नंतर कल्याण-डोंबिवलीत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने काही निर्बंध सुद्धा लागू केले आहेत.