मुंबईतील जुहू या ठिकाणी असलेल्या युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India) या बँकेतून जवळजवळ 70 ग्राहकांच्या खात्यामधून अवघ्या सहा तासांमध्ये 20 लाख रुपयांची चोरी करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही घटना जुहू मधील तारा रोड येथील असून डुप्लिकेट डेबिट कार्डच्या माध्यमातून हा उप्दव्याप चोरट्यांकडून करण्यात आला असून त्यांनी जवळजवळ 15 ते 20 लाख रुपयांची रोकड सहा तासात पळवली आहे.
चोरट्यांकडून बँक खात्यामधील रक्कम ही विविध बँकांच्या एटीएम मधून लांबवण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बँकेतून खात्यामधील रक्कम कोणत्या एटीएम मधून काढली आहे याची माहिती आणि सिसीटीव्ही फुटेज त्यांच्याकडे घेतले आहेत. बँक खात्यामधून काढण्यात आलेली ही रक्कम 8 डिसेंबर आणि 9 डिसेंबर पहाटे 6.30 दरम्यान काढण्यात आली आहे. चोरट्यांनी युनियन बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांच्या खात्यामधून रक्कम लांबवले आहेत. ही रक्कम जवळजवळ 20 लाखापर्यंत आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.तर या प्रकरणी पोलिसांनी खात्यामधून किती रक्कम काढली गेली याची सुद्धा माहिती घेत आहे. मात्र बँक खात्यामधून पैसे चोरीला गेल्याने ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून चोरट्यांच्या शोध घेण्यास सुरुवात केली असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
सध्या सिम स्वाइप म्हणजे सिम एक्सेंचेंज किंवा सिम कार्ड क्लोनिंग पद्धतीचा वापर भामट्यांकडून केला जात आहे. यामध्ये तुमचा मोबाईल क्रमांकावरुन एका नव्या सिम कार्डसाठी रजिस्ट्रेशन केले जाते. त्यावेळी तुमचे सुरु असलेले सिम कार्ड बंद होते आणि फोनवरील नेटवर्क दाखवले जात नाही. असे झाल्यानंतर फसवणुक करणारा व्यक्ती दुसऱ्या सिम कार्डवर येणारा ओटीपी क्रमांकाचा वापर करुन तुमच्या बँक खात्यातील रक्कम चोरी करतो.