Sharad Pawar Bare feet | X

26 ऑगस्टला मालवण मध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा आज मविआ ने निषेध केला आहे. दरम्यान अवघ्या 8 महिन्यातच पुतळा कोसळल्याने या पुतळ्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याची बाब अधोरेखित करत मविआ ने महायुती सरकार वर भ्रष्टाचाराचेही आरोप केले आहेत. सरकार चा निषेध करण्यासाठी आज मविआ ने हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया या भागात मोर्चा काढला. या मोर्चामध्ये शरद पवार (Sharad Pawar) देखील सहभागी झाले होते. गेटवे ऑफ इंडिया च्या परिसरामध्ये सरकारच्या पोस्टवर मविआ च्या नेत्यांनी जोडे मारत त्यांचा निषेध केला.

शरद पवार अनवाणी चालले

मुंबई मध्ये मविआ च्या मोर्चाला आधी मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली होती मात्र नंतर बॅरिकेट हटवत मोर्चा पुढे सरकला. 83 वर्षीय शरद पवार यावेळी पायाला बॅन्डेज बांधून अनवाणी चालताना दिसले. शरद पवारांसोबतच खासदार शाहू महाराज देखील हजर होते. त्यांनी आपण शिवरायांच्या सन्मानार्थ चालत असल्याचं म्हटलं.

जोडे मारो आंदोलन

मविआ चा महायुतीवर हल्लाबोल

मविआ ने आज महायुतीवर हल्लाबोल केला आहे. गेटवे ऑफ इंडिया परिसरात पोहचताच मविआ च्या वरिष्ठ नेत्यांनी 'महायुती'च्या पोस्टरला 'जोडे मारले' त्यानंतर टीकास्त्र डागताना आता पुतळा पुन्हा बांधण्यासाठी भ्रष्टचार होणार असल्याचं म्हटलं. उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आपल्या जबाबदारीपासून दूर जात आहेत ही गंभीर बाब असल्याचं म्हटलं आहे. नाना पटोले यांनीही हे शिवविरोधी लोकं असल्याचं म्हटलं आहे. MVA Protest in Sindhudurg over Shivaji Maharaj Statue Collapse: 'शिवद्रोह्यांना करू गपगार, माफी नाही हद्दपार'; एमव्हीएकडून मुंबईत फलकबाजी.   

‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’  म्हणत मविआ चे कार्यकर्ते गेट वे ऑफ इंडियाला दाखल झाले होते. मुंबई मध्ये गेटवे प्रमाणेच छ. संभाजीनगर मध्ये क्रांती चौकातही आंदोलन करण्यात आले होते.