Dr.Jitendra Awhad and Balasaheb Thorat | Phot Credits: Twitter

भारतामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 2300 च्या पार गेल्याने आता मुंबई, केरळ, तामिळनाडू, दिल्लीत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. एकीकडे देश लॉकडाऊन असल्याने आर्थिक संकटदेखील समोर आहे. त्यामुळे काल देशातील सार्‍या मुख्यमंत्र्यांना, आरोग्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना कोरोना मिशनच्या पुढील टप्प्याची माहिती दिल्यानंतर आज व्हिडिओ मेसेजद्वारा काय बोलणार? याकडे देशवासीयांचं लक्ष लागलं होतं. त्यानुसार देश लॉकडाऊन असला तरीही आपण भारतीय एक आहोत. कोरोनाचा एकत्र सामना करणं आवश्यक आहे. याच एकजुटीचं दर्शन घडवण्यासाठी 5 एप्रिलच्या रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरातील सारे लाईट्स विझवून स्मार्टफोनचा फ्लॅश लाईट, मेणबत्ती, दिवा किंवा टॉर्च लावा असं आवाहन केले आहे. मात्र नरेंद्र मोदींच्या या उपक्रमाला काहींनी विरोध दर्शवला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जितेंद्र आव्हाड, कॉंग्रेसचे बाळासाहेब यांनी ट्वीटरच्या माध्यमातून मोदींच्या उपक्रमावर टीका केली आहे. Coronavirus in India: 5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी एक दिवा लावा, कोरोनाच्या अंध:काराला दूर करण्यासाठी एकजूट दाखवा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन.  

देशात कोरोना व्हायरसचं संकट गंभीर होत चाललं आहे. मजूर, गोर गरीब जनता या लॉकडाऊनच्या काळात देशाच्याविविध भागांमध्ये अडकली आहेत. या संकटाला थोपण्यासाठी कडक पावलं उचलण्याऐवजी अशाप्रकारचे उपक्रम घेण्याच्या मोदींच्या कल्पनेवर अनेकांनी टीला देखील केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांचं ट्वीट

बाळासाहेब थोरात यांचं ट्विट

भारतामध्ये तबलिगी जमाताचा एक धार्मिक कार्यक्रम दिल्लीच्या निजामुद्दीन भागात झाला होता. यामध्ये मार्च महिन्यात सुमारे 3000 जणांचा सहभाग होता. कार्यक्रम आटोपल्यानंतर हे मुस्लिम बांधव आपल्या घरी परतले. या मोठ्या सामुहिक कार्यक्रमामुळे देशभर कोरोनाबाधितांच्या आकड्यांमध्ये वाढ होण्याची भीती आहे. सध्या तात्काळ मरकजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी लोकांना शोधून त्यांची सोबत त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा, पोलिस आणि पालिका कर्मचारी लागले आहेत.