देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारवर केलेल्या फोन टॅपींग (Phone Tapping Case in Maharashtra) प्रकरणातील आरोपनंतर महाविकासआघाडी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमधील मंत्री विरोधकांचे हल्ले परतवून लावताना दिसत आहे. ज्या रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांच्या अहवालाचा आधार घेत विरोधकांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत त्या शुक्ला यांच्यावरच सरकार कारवाई करण्याची शक्यता आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी तर अहवालात नावे आले्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारचा सल्ला घेऊन थेट न्यायालयात जावे असा सल्ला दिला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिकाऱ्यांना हा सल्ला दिला. तसेच, आपल्या ट्विटर हँडलवरुनही आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (हेही वाचा, 'मुख्यमंत्री योग्य वेळ आली की बोलतील, महाविकास आघाडी सरकारला 175 हून अधिक आमदारांचे पाठबळ'- Minister Nawab Malik)
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं?
हाविकासआघाडीची बदनामी करण्याचं कारस्थान
आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''राज्य सरकारला मूर्ख बनवत रश्मी शुक्ला यांनी 'अ' व्यक्तीच्या फोन टॅपिंगची परवानगी घेऊन 'B' व्यक्तीचा फोन टॅप केला हे अत्यंत भयंकर आहे आणि या रिपोर्टच्या माध्यमातून महाविकासआघाडीची बदनामी करण्याचं हे एक नियोजनबद्ध केलेलं कारस्थान होतं''.
राज्य सरकारकडून फोन टॅपिंगसाठी परवानगी देण्याची कारणे आहेत. फोन टॅपिंग नेमकं कोणत्या कारणासाठी आणि व्यक्तीसाठी केली जाते आणि नेमके काय घडले हे समस्त महाराष्ट्रासमोर जाहिररित्या आलं पाहिजे
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 24, 2021
फोन टॅपिंग नेमकं कोणत्या कारणासाठी?
''राज्य सरकारकडून फोन टॅपिंगसाठी परवानगी देण्याची कारणे आहेत. फोन टॅपिंग नेमकं कोणत्या कारणासाठी आणि व्यक्तीसाठी केली जाते आणि नेमके काय घडले हे समस्त महाराष्ट्रासमोर जाहिररित्या आलं पाहिजे.''
राज्य सरकारला मूर्ख बनवत रश्मी शुक्ला यांनी 'अ' व्यक्तीच्या फोन टॅपिंगची परवानगी घेऊन 'B' व्यक्तीचा फोन टॅप केला हे अत्यंत भयंकर आहे आणि या रिपोर्टच्या माध्यमातून महाविकासआघाडीची बदनामी करण्याचं हे एक नियोजनबद्ध केलेलं कारस्थान होतं.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 24, 2021
फोन चोरून ऐकण्याची विकृत मानसिकता
आव्हाड यांनी पुढे म्हटले आहे की, ''अहवाल नीट वाचल्यावर कळतं की यात फक्त फोन चोरून ऐकण्याची विकृत मानसिकता, पराकोटीचा प्रांतवाद, आणि जात्यांधपणा आहे. भ्रष्टाचाराचा कणभरही पुरावा नाही. हा थिल्लरपणा धोकादायक आहे''.
अहवाल नीट वाचल्यावर कळतं की यात फक्त फोन चोरून ऐकण्याची विकृत मानसिकता, पराकोटीचा प्रांतवाद, आणि जात्यांधपणा आहे. भ्रष्टाचाराचा कणभरही पुरावा नाही. हा थिल्लरपणा धोकादायक आहे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 24, 2021
अजून किती जणांचे फोन टॅपिंगला लावले होते?
पोलिस अधिकारी आहोत म्हणून कोणीही नागरिकांचा फोन टॅप कसा करू शकेल? त्याकरिता त्यांचे कोणतेही नियम व कायदे नाहीत? या प्रकरणात असे दिसते की अधिकार्यांना वाटलं की ते काहीही करु शकतात आणि याची कोण खात्री देईल की अजून किती जणांचे फोन टॅपिंगला लावले होते?, असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, फोन टॅपींग प्रकरणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. या भेटीबाबत दिलेल्या वृत्तात एएनआयने म्हटले आहे की, फडणवीस यांनी 'पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि फोन टॅपींग या संदर्भात चारत असलेल्या कथीत रॅकेटचा 6.3 GB डेटा' केंद्रीय गृहसचिवांना दिला आहे. या भेटीबाबत फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी बोलताना फडणवीस म्हणाले, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये होणाऱ्या व्यवहार प्रकरणाची चौकशी सीबीआय द्वारे व्हावी अशीहमागणी आपण केली आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळेच आपण या प्रकरणातील माहिती सार्वजनिक करत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, पोलिसांच्या बदल्यांप्रकरणात होत असलेल्या व्यवहारांबाबत आम्ही केवळ गृहसचिवांना भेटून थांबणार नाही आहोत. गरज पडल्यास आम्ही कोर्टातही जाणार आहोत. महाराष्ट्रातील सरकार कोणाला पाठिशी घालत आहे. पोलीस दलात बदल्यांबाबत होत असलेले व्यवहार पाहता मुख्यमंत्र्यांनी याबाबत बोलायला हवे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी म्हटले.