'मुख्यमंत्री योग्य वेळ आली की बोलतील, महाविकास आघाडी सरकारला 175 हून अधिक आमदारांचे पाठबळ'- Minister Nawab Malik
Nawab Malik (Photo Credits: Twitter)

आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (Nationalist Congress Party) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी, विविध मुद्द्यांवरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मौन’ विषयी भाजपने उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर दिले. मुख्यमंत्री योग्य वेळी बोलतील असे त्यांनी बुधवारी सांगितले. यासह, त्यांनी दावा केला की, राज्याच्या महाविकास आघाडी सरकारला 175 हून अधिक आमदारांचे पाठबळ आहे. त्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारवर भाजपने विविध मुद्द्यांवर केलेले आरोप 'निराधार' असल्याचेही स्पष्ट केले. राज्य सरकारमधील अल्पसंख्याक विकास मंत्री म्हणाले की, राज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ अशीच लागू केली जाऊ शकत नाही, हे भाजपाला समजले पाहिजे.

भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर नवाब मलिक यांनी भाष्य केले. भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना राज्य सरकारकडे सद्यस्थितीचा अहवाल मागवून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्याची विनंती केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांच्या कथित मौनाबाबत विविध विषयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मलिक म्हणाले की, शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस असे तीन पक्षांनी एकत्र मिळून बनलेल्या महाविकासआघाडीला 288 सदस्यांच्या विधानसभेत 175 हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे.

मलिक यांनी 'पीटीआय-भाषा'ला सांगितले की, ‘मुख्यमंत्री योग्य वेळी बोलतील. त्यांना प्रत्येक विषयावर बोलण्याची गरज नाही. भाजपचे आरोप निराधार आहेत. अर्ध्या-अपूर्ण माहितीच्या आधारे भाजप राज्य सरकारला बदनाम करण्याच्या कटात सहभागी आहे, हे राज्यातील लोकांना समजण्यास सुरूवात झाली आहे.’ राज्य सरकार अधिक काळ टिकणार नाही, असा दावा करून भाजप आपल्या रणनीतीचा एक भाग म्हणून जनतेमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मलिक यांनी केला. (हेही वाचा: Sindhudurg ZP President Election 2021 Result: कोकणात राणेंचा बालेकिल्ला अभेद्य; सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपाच्या संजना सावंत विजयी)

फडणवीस यांनी मंगळवारी दावा केला की, राज्य सरकार गुप्तहेर विभागाच्या 'गुन्ह्यामध्ये सहभाग' या अहवालावर कारवाई करीत नाही, ज्यामध्ये पोलिस बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार असल्याचे दर्शवणारे ऑडिओ संभाषणे आहे.