राज्यात कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) झपाट्याने पसरत असून दिवसागणित रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे सध्याची कोरोना परिस्थिती पाहता या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे ट्विटच्या माध्यमातून केली आहे. (Jitendra Awhad Praises CM: उद्धव ठाकरे होणं अवघड आहे- जितेंद्र आव्हाड)
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये लिहिले, "कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असून ही परिस्थिती लक्षात घेता या महिन्यात होणाऱ्या सर्व स्पर्धात्मक परीक्षा पुढे ढकलाव्या. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची परीक्षा सुद्धा पुढे ढकलण्यात यावी, अशी मी विद्यार्थ्यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर या परीक्षा घेण्यात याव्या."
Jitendra Awhad Tweet:
सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता, या महिन्यात होणारी
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची परीक्षा सुद्धा समोर ढकलण्यात यावी , याबाबद्दल सुद्धा तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.#muhs #muhsexam #muhsexampostpone
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 9, 2021
Keeping in mind the current situation where #Corona is spreading rapidly; on behalf of the #Students I have appealed to our Hon. CM to postpone all competitive exams which are scheduled in this month to a later date when the #COVID situation is under control.#mpscexam#mhuexam
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 8, 2021
या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी एमपीएससी आणि एमएचयु परीक्षा असे दोन हॅशटॅग वापरले आहेत. 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहेत. यापूर्वी एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्यामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला होता. त्यामुळे आता सरकार नेमकं काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, या महिन्यात महाराष्ट्र बोर्डाची 10 वी, 12 वी ची परीक्षा देखील सुरु होणार आहे.