
पुणे (Pune) जिल्ह्यातून एका युवकाला लोहगाव विमानतळ पोलिसांनी (Lohegaon Police) अटक केली आहे. त्याच्यावर सोसायटीत घुसून दुचाकी जाळणे आणि वाहनांना आगी लावल्याचा आरोप आहे. आरोपीने एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. तरुणाचे एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. या तरुणाने तरुणीच्या सायटीत बेकायदेशिररित्या प्रवेश केला आणि दुचाकी (Jilted Lover Burns Bike Of Girl's Father) पेटवली. जी तरुणीच्या वडिलांची होती. यात इतर तीन वाहनांनाही आग लागल्याची घटना घडली.
लोहगाव येथील पीडितेच्या वडिलांनी विमाननगर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तसेच, तरुणाला अटकही केली आहे. श्रीराम घाडगे (रा. वाघोली, पुणे) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. आरोपीसोबत त्याच्या इतर साथीदारांवरही गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास खांदवेनगर येथे ही घटना घडली.
पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीराम घाडगे आणि पीडिता विमाननगर परिसरात एकाच महाविद्यालयात शिकत आहेत. आरोपीचे पीडितेवर एकतर्फी प्रेम होते. त्यातून तो तरुणीवर दबाव टाकत होता. माझ्यासोबत बोलत जा असे म्हणत आरोपी सातत्याने तरुणीवर दबाव टाकत असे. तिने ही बाब आपल्या वडिलांना सांगितली. त्यानंतर वडिलानी स्वत: आरोपीला सांगितले की, तिला तुझ्याशी बोलायचे नाही उगाच तू तिला त्रास देऊ नको. (हेही वाचा, Mumbai: विरारला जाणाऱ्या लोकलमध्ये गोरेगावमधील कारपेंटरने काढली तरुणीची छेड; आरोपीला अटक)
दरम्यान, तरुणीने ही बाब वडिलांपर्यंत नेली याचा राग मनात ठेऊन आरोपीने त्याच्या साथीदाराला बोलावले. त्याने सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास पार्किंगमध्ये लावलेला दुचाकीलाच आग लावली. या घटनेत बाजूला उभ्या असलेल्या दुचाकींनाही आग लागली आणि त्यांचे नुकसान झाले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु केला आहे.