महाराष्ट्र एटीएसने ( Maharashtra ATS) एका माओवादी नेत्याला (Maoist Leader) ताब्यात घेतले आहे. तो झारखंड (Jharkhand) राज्यातील बंदी घालण्यात आलेल्या माओवादी संघटनेत सक्रीय आहे. पूर्व नालासोपारा (Nalasopara) येथील धान्वी येथून पोलिसांनी या नेत्याला ताब्यात घेतले. रविवारी (18 सप्टेंबर) पहाटे ही कारवाई करण्यात आली. या माओवादी नेत्यांवर तब्बल 15 लाख रुपयांचे इनाम होते. करू हुलास यादव (Karu Hulas Yadav) असे या नेत्याचे नाव आहे. तो झारखंडमधील प्रतिबंधित सीपीआय (माओवादी) (Communist Party of India (Maoist)) च्या प्रादेशिक समितीचा सदस्य होता.
करू हुलास यादव हा 45 वर्षीय गृहस्थ पाठिमागील अनेक वर्षांपासून माओवादी चळवळीत सक्रीय आहे. तो झारखंडमधील माओवादी चळवळीत सक्रीय आहे. झारखंडमधील प्रतिबंधित सीपीआय (माओवादी) च्या प्रादेशिक समितीचा सदस्य होता, अशीही माहिती आहे. (हेही वाचा, IED Blast: बिहारमध्ये IED स्फोटात 3 कोब्रा जवान जखमी, प्रकृती चिंताजनक असल्याची रुग्णालयाची माहिती)
कुरु हुलास यादव हा मूळचा गाव दोडगा, तहसील कटकमसांडी, हजारीबाग जिल्हा, झारखंडचा रहिवासी आहे. 2004 पासून सीपीआय (माओवादी) मध्ये सक्रिय आहे आणि त्याच्यावर 15 लाख रुपयांचे बक्षीस आहे. वैद्यकीय उपचारासाठी तो महाराष्ट्रात आला होता.
झारखंड पोलिसांना या कारवाईची माहिती देण्यात आली आहे. पुढील चौकशी सुरू आहे, असे महाराष्ट्र एटीएसने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.