Pune Crime News PC TWITTER

Pune Crime News: पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. चोरी, मारामारी, हल्ला, बलात्कार अश्या गुन्हेगारांचा मालिका सुरुच आहे. त्यात शनिवारी भरदिवसा एका सोनाऱ्याच्या दुकानांत चोरट्यांनी चोरी केल्याची घटना समोर येत आहे. ही घटना संपुर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ही घटना पुण्यातील महमदवाडी रोडवरील वारकर मळा येथील बीजीएफ ज्वेलर्समध्ये घडली आहे. सात ते आठ चोरटे दुकानात शिरल्याचे कॅमेऱ्यात दिसले. (हेही वाचा- नोकरी देण्याच्या बहाण्याने वरळीत 24 वर्षीय महिलेवर बलात्कार; आरोपीला अटक)

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी सोन्याच्या दुकानातून 300 ते 400 ग्रॅम सोने लुटल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दुकानात सात ते आठ चोरटे शिरले. त्यानंतर एका चोरट्याने दुकानातील कर्मचाऱ्याला मारहाण केली. एकाने बंदुक दाखवून धमकी दिली आणि इतर चोरट्यांनी दुकानातील सोन्याचे वस्तू चोरण्यास सुरुवात केली. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, काऊंटरवर असलेल्या दुकानातील कर्मचाऱ्याला एकाने चोराने पकडून ठेवले होते. त्याला मारहाण देखील केली आणि इतर चोरट्यांनी दुकानात दरोडा टाकला.

भरदिवसा तोंडाला मास्क लावून सात ते आठ जणांनी दुकानात चोरी केली. चोरी करून घटनास्थळावरून चोर फरार झाले. या घटनेची माहिती जवळच्या पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी घटनेची नोंद करून घेतली आहे. पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरु केली. शहरात वाढत्या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन आठवड्यापूर्वी पुण्यातील वनवाड येथे एका सोन्याच्या दुकानात चोरट्यांनी ३७२ ग्रॅम चोरी केली होती.