जेट एअरवेजची (Jet Airways) सेवा सध्या स्थगित करण्यात आली आहे. तसेच कर्जात बुडालेल्या जेट एअरवेजने गेल्या दोन तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा दिलेले नाहीत. तर काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांनी याबद्दल आंदोलनसुद्धा केले होते. तर आता नालासोपारा (Nala Sopara) पूर्व येथे राहणाऱ्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्याने इमारतीवरुन उडी टाकत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर जेटच्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची ही पहिलीच घटना आहे.
महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शैलेंद्र सिंह असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. सिंह हे कर्करोगाने आजारी असून ते ताणतणावात होते. तर जेट एअरवेजने थकवलेल्या पगारामुळे त्यांची आर्थिक स्थिती बिघडली होती. त्यामुळेच सिंह यांनी आत्महत्या केली असल्याचा दावा जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.(जेट एअरवेजवर कर्जाचा डोंगर; कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल आणि अनिता गोयल यांनी दिला बोर्ड सदस्यत्वाचा राजीनामा)
Delhi: #JetAirways employees and their families hold candle light protest at Jantar Mantar. pic.twitter.com/T9DZ2hqyle
— ANI (@ANI) April 27, 2019
जेटची कंपनी बंद पडल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक तंगी निर्माण झाली आहे. तर सिंह यांचा मुलगासुद्धा जेट एअरवेजमध्ये ऑपरेशन्स डिपार्टमेंटमध्ये नोकरीला आहे. परंतु कंपनी बंद झाल्याने सिंह यांनी ताणतणावात येऊन आत्महत्या केली आहे. सिंह यांच्या पाठी पत्नी दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपासणी केली जात आहे.