बहादूरीपणाची तुलना जगातील कोणत्याही मौल्यवान वस्तूशी केली जाऊ शकत नाही. परंतु, वांगणी रेल्वे स्थानकात चिमुकल्याचा जीव वाचवणाऱ्या पोस्टमन मयूर शेळके (Mayur Shelke) याला Jawa ने एक मोटरसायकल गिफ्ट केली आहे. मयूर शेळके यांनी स्वत: च्या जीवावर खेळून रेल्वे रुळावर एका चिमुकल्याचा जीव वाचवला. यासाठी त्याने आपल्या जीवाची पर्वा केली नाही. तो तुफानाप्रमाणे धावला आणि त्याने रुळावर पडलेल्या मुलाला जीवनदान दिले. त्याच्या या शौर्याचे देशभरातील लोक कौतुक करीत आहेत. याशिवाय मयूरला रेल्वेकडून 50,000 रुपये पुरस्कार म्हणून देण्यात आले आहेत. (वाचा - Mayur Shelke च्या साहसाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली दखल; स्वतः फोन करून केले कौतुक, ऐका काय म्हणाले)
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वांगणी रेल्वे स्थानकात चिमुकल्याचा जीव वाचवणाऱ्या मयूर शेळकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोक मयूर शेळके यांच्या शौर्याबद्दल बोलत आहेत. या मुलाचा जीव वाचवल्यानंतर, मयूर शेळके यांनी आणखी एक मोठं काम केलं आहे. रेल्वेने दिलेल्या पुरस्कार रकमेतून मयूर यांनी निम्मी रक्कम या मुलाच्या शिक्षणासाठी देण्याचं जाहीर केलं. त्याचा हा मनाचा मोठेपणा महाराष्ट्रातील प्रत्येकाला भावला आहे. (वाचा - Mayur Shelke च्या मनाचा मोठेपणा! बक्षिसातील अर्धी रक्कम वांगणी रेल्वे स्थानकात जीव वाचवलेल्या मुलाच्या शिक्षणासाठी देणार)
मयूर शेलके यांना कंपनीने Jawa 42 मोटरसायकल गिफ्ट म्हणून दिली. या Jawa 42 सीसीचे लिक्विड-कूल्ड आणि फ्यूल इंजेक्शन इंजिन आहे. जी 6,800 आरपीएम येथे जास्तीत जास्त 27bhp ची उर्जा आणि 5000rpm वर जास्तीत जास्त 27.03Nm ची टॉर्क तयार करते.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, या मोटारसायकलमध्ये क्रॉस पोर्ट तंत्रज्ञान वापरणारे पहिले सिंगल सिलिंडर इंजिन आहे. 2021 जावा फोर्टी टूचे वजन 172 किलो आहे. या मोटारसायकलला कंपनीने नवीन डिझाईन दिले आहे. जावा 42 आता तीन नवीन रंगांमध्ये उपलब्ध आहे - ओरियन रेड, सीरियस व्हाइट आणि ऑलस्टार ब्लॅक. नवीन जावा फोर्टी टूमध्ये 13 इंचाची स्पोक अॅलोय व्हील्स आहेत. यासह, यात ट्यूबलेस टायर्स, कंपनीचा लोगो आणि बाजुला पुन्हा डिझाइन केलेले ग्राफिक्स, हेडलाइट बेझल, सेमी डिजिटल इंस्ट्रूमेंट कन्सोल, हॅलोजन हेडलॅम्प्स आहेत.