
शालेय जिवनात असताना प्रत्येक विद्यार्थ्यांला एक तरी दिवसासाठी असं नक्कीचं वाटत की आज आपले गुरुजी शाळेत येवूचं नये आणि आपल्याला शाळेत मस्त धम्माल मस्ती करता यावी. शाळा आणि गुरुजी कितीही लाडके असले तरी गुरुजी न आल्यावर घातलेल्या धिंगाण्याची मज्जा काही औरचं. पण असंचं काहीस जालन्यातील विद्यार्थ्यांसोबत घडलं असताना या शाळेतील विद्यार्थ्यांना संपूर्ण गाव डोक्यावर घेतला. त्याचं झालं असं की जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील भांबेरी गावातील शाळेतील शिक्षकांची बदली होणार असल्याची बातमी कानावर पडली. यावर कुठल्याही पध्दतीचा कागदपत्र गुरुजीस मिळाले नाही किंवा त्यासंबंधित काहीही अधिकृत माहिती प्राप्त झाली नसतांना शाळेतील विद्यांर्थ्यांमध्ये गुरुजीच्या बदलीची बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरली आणि गुरुजींना आता आपल्याचं शाळेत थांबवण्यासाठी काय करावं यासाठी विद्यार्थी शक्कल लढवू लागले.
बदली झालेल्या शिक्षकांचं नाव मच्छिंद्र घोडसे गुरुजी. घोडसे गुरुजी म्हणजे संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक. अगदी शाळेतल्या पहिल्या वर्गापासून ते शेवट्या वर्गापर्यत गुरुजी फेमस. मग आता गुरुजींना थांबवायचं कसं यासाठी विद्यार्थ्यांनी एक आयडियाची कल्पनाचं लढवली. संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांनी गावभरात प्रभात फेरी काढली आणि हातात फलक घेवून रद्द करा रद्द करा, घोडसे सरांची बदली रद्द करा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. (हे ही वाचा:- विद्यार्थ्यांना दिलासा! तांत्रिक विषयांचे होत आहे मराठीकरण, कायदेविषयक शिक्षणही मराठी भाषेतून देण्यात येणार- Minister Chandrakant Patil)
संपूर्ण गावकऱ्यांचं विद्यार्थ्यांच्या या प्रभातफेरीनं लक्ष वेधल. गावातील सरपंच, पोलिस पाटलांसह अनेक जेष्ठ मंडळींनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. तरी बघता बघता या प्रभातफेरीची चर्चा केवळ भांबेरी गावापूर्तांचं नाही सर संपूर्ण जालना जिल्ह्यात गाजली. तरी विद्यार्थ्यांच्या या अनोख्या प्रयत्नानंतर घोडसे गुरुजींच्या बदलचं काय होणार याकडे संपूर्ण गावकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.