बुधवारी (2 जुलै) रत्नागिरी (Ratnagiri) मधील तिवरे धरण (Tiware Dam) फुटल्याची दुर्घटना घडली आहे. यामध्ये 20 पेक्षा अधिक जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. तर आता जालना (Jalna) मधील धामणा धरणाला (Dhamana Dam) तडे गेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तडे गेलेल्या धरणात 90 टक्के जलसाठा आहे. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास अधीच तडे गेलेल्या धरणामुळे परिसरातील गावांना त्याचा धोका उद्भवू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
धामणा धरण भोकरदन तालुक्यामधील सेलूद येथे आहे. तर राज्यात पावसाच्या दमदार हजेरीमुळे गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच धरणाचे पाणी 90 टक्के भरले गेले आहे. परंतु धरणाच्या भिंतीला तडे गेल्याने तेथून पाणी बाहेर येत अससल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर धरणाच्या तड्यांमुळे सेलूद, खुर्द, पारध आणि बुद्रुक या गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(रत्नागिरी: चिपळूण येथील तिवरे धरण फुटल्याने 24 जण वाहून गेल्याची भिती; 6 मृतदेह सापडले)
तर गेल्या काही दिवसांपासून पावसाने लावलेल्या हजेरीमुळे त्याचा परिणाम नागरिकांवर होत आहे. तसेच धरणाला तडे गेल्यामुळे अधिकच धोक्याची परिस्थिती तेथे निर्माण झाली आहे.