बबनराव लोणीकर (Photo Credits-Facebook)

भाजप नेते बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांची भर जाहीर कार्यक्रमात जीभ घसरल्याचा प्रकार समोर आला आहे. जालना  मधील एका कार्यक्रमात त्यांनी विधान करत असे म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या मोर्चावेळी गर्दी करण्यासाठी हिरोईन आणू. लोणीकर यांच्या या आक्षेपार्ह विधानामुळे आता त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. तसेच पुढे त्यांनी स्टेजवरील बसलेल्या तहसीलदार सु्द्धा हिरोईनसारख्या दिसल्याचे ही म्हटले आहे. लोणीकर यांची ही व्हिडिओ क्लिक सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

बबनराव लोणीकर यांनी गर्दीसाठी हिरोईन आणूच्या विधानावरुन आता विरोधकांकडून जोदार टीका करण्यात येत आहे. लोणीकर यांच्या विधानाचा निषेध राष्ट्रवादी पक्षाच्या आमदार विद्या चव्हाण यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याऐवजी लोणीकर काय आक्षेपार्ह विधान करत आहेत असे ही त्यांनी म्हटले आहे. उलट हिरोईन आणण्यापेक्षा मोर्चाला शेतकऱ्यांना घेऊन या. भाजपाच्या मोर्चात शेतकरी सहभागी होत नाहीत म्हणून गर्दीसाठी असा प्रयत्न केला जात असल्याचे ही चव्हाण यांनी म्हटले आहे.(महाराष्ट्राचे पाणी गुजरात जाऊ देऊ नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

 लोणीकर यांनी आक्षेपार्ह विधानात असे म्हटले आहे की, सरकारकडून 25 हजार रुपये अनुदान हवे असल्यास मराठवाड्यात सर्वात मोठा मोर्चा काढायचा का असा सवाल उपस्थित केला. या मोर्चाला भाजपची बडी नेतेमंडळींना आणूच पण तुम्हाला वाटलं तर हिरोईन सुद्धा मोर्चाला आणू असे विधान त्यांनी केले आहे. लोणीकर यांच्या विधानावरुन काय कारवाई करता येईल याबात माहिती घेऊन ती करु असे तहसीलदार संघटनेच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.