महाराष्ट्राचे पाणी गुजरात जाऊ देऊ नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्राचे पाणी हे गुजरातला जाऊ देऊ नका कारण गुजरातचे पाणी आणि महाराष्ट्राचे पाणी हे दोन वेगवेगळे विषय आहेत. त्यामुळे आपले पाणी आपलेच आहेत अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिल्या आहेत. गुरुवारी नाशिक जिल्ह्यात झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गुजरातला पाणी देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट संकेत या माध्यमातून मिळाले असून वळण योजनांचा विषय मार्गी लागण्यासही गती दिली जाणार आहे.

नाशिक विभागातील विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी ही विशेष बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेथील आमदारांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा समजून घेतल्या. त्यांच्या काय मागण्या आहेत हे ऐकून घेतल्या. मटा ने दिलेल्या वृत्तानुसार, यावेळी महाराष्ट्राचे पाणी आणि गुजरातचे पाणी या मुद्द्यावर बोलताना गुजरातचे पाणी व महाराष्ट्राचे पाणी हा विषय आता राहिलेलाच नाही. जे पाणी आपले आहे ते आपलेच आहे. ते गुजरातला न जाता आपल्याकडे कसे आणायचे यावर काम सुरू करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी बैठकीत दिल्याचे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे विभाजन होणे शक्य नाही' उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण

बैठकीला पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, हेमंत टकले, मौलाना मुक्ती, सरोज अहिरे, देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, दिलीप बोरसे, नितीन पवार, नरहरी झिरवाळ, सुहास कांदे, माणिकराव कोकाटे, हिरामण खोसकर, डॉ. राहुल आहेर, दिलीप बनकर, मुख्य सचिव अजोय मेहता, कृषी सचिव एकनाथ डवले, जलसंपदा सचिव आय. एस. चहल, ऊर्जा सचिव असिमकुमार गुप्ता, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी उज्वला बावके आदी उपस्थित होते.

नाशिक जिल्ह्यात येऊन मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्याने सर्व आमदारांनी समाधान व्यक्त केले. या बैठकीला या शहरासह जिल्ह्यातील अनेक आमदार उपस्थित होते.